Bigg Boss: 'बिग बॉस'च्या घरातूनच झाली प्रसिद्ध अभिनेत्याला अटक! नेमकं कारण काय?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss: 'बिग बॉस'च्या घरातूनच झाली प्रसिद्ध अभिनेत्याला अटक! नेमकं कारण काय?

Bigg Boss: 'बिग बॉस'च्या घरातूनच झाली प्रसिद्ध अभिनेत्याला अटक! नेमकं कारण काय?

Published Oct 24, 2023 08:03 AM IST

Bigg Boss Contestant Arrest: 'बिग बॉस'च्या घरातील अभिनेत्याची एक चूक त्याला आता चांगलीच महागात पडली आहे. यामुळेच त्याला अटक झाली आहे.

varthur santhosh
varthur santhosh

Bigg Boss Contestant Arrest: टीव्हीचा वादग्रस्त शो 'बिग बॉस १७' सध्या चर्चेत आहे. 'बिग बॉस' हिंदीसोबतच काही इतर भाषांमध्ये देखील हा शो सुरू झाला आहे. यातीलच 'कन्नड बिग बॉस १०' आता प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. कन्नड बिग बॉसच्या एका स्पर्धकाला शोच्या दरम्यान म्हणजेच घरात असतानाच अटक करण्यात आली आहे. किच्चा सुदीप सूत्रसंचालनाची धुरा संभाळत असणाऱ्या 'कन्नड बिग बॉस १०' या शोमधील लोकप्रिय स्पर्धक वर्थुर संतोषला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्याची एक चूक त्याला आता चांगलीच महागात पडली आहे. यामुळेच त्याला अटक झाली आहे. जाणून घ्या काय आहे हे नेमकं प्रकरण...

'कन्नड बिग बॉस १०' या शोमधील लोकप्रिय स्पर्धक वर्थुर संतोष याने त्याच्या गळ्यात घातलेले एक लॉकेट वादाचा केंद्रबिंदू बनले आहे. त्याने घातलेल्या लॉकेटवरूनच संपूर्ण गोंधळ निर्माण झाला होता. वर्थुर संतोष याने गळ्यात घातलेल्या लॉकेटमध्ये वाघनखं होती. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. एफआयआर दाखल होताच या स्पर्धकावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आणि त्याला बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली.

Mallika Sherawat Birthday: रीमा लांबा का बनली बॉलिवूडची मल्लिका शेरावत? वाचा अभिनेत्रीबद्दल...

मीडिया रिपोर्टनुसार, २२ ऑक्टोबर रोजी वन विभागाचे अधिकारी 'कन्नड बिग बॉस १०'च्या सेटवर पोहोचले होते. त्यांनी निर्मात्यांना शोमधून वर्थुर संतोषची चेन आणि लॉकेट आणण्यास सांगितले होते. यानंतर त्याने लॉकेटची नीट तपासणी केली गेली. या तपासणीत ती वाघनखं खरी असल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी लगेचच वर्थुर संतोषला अटक केली. सध्या वनविभागही या लॉकेटची चौकशी करत आहे.

वर्थुर संतोषने कॅमेऱ्यासमोर गुन्ह्याची कबुली देताच रात्री साडेआठच्या सुमारास त्याला तत्काळ अटक करण्यात आली. वर्थुर संतोषकडून वन्यजीव संरक्षण कायदा १९७२चे उल्लंघन झाले आहे. वाघ ही नष्ट होत चाललेली प्रजाती मानली जाते. अशा परिस्थितीत हा कायदा मोडल्यास तीन ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. आता वर्थुर संतोषचे या प्रकरणात पुढे काय होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Whats_app_banner