Sofia Hayat: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लग्नासाठी दुबईत गेली अन् तरुंगात पोहोचली; काय झालं नेमकं जाणून घ्या-bigg boss 7 fame actress sofia hayat arrested by dubai police ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sofia Hayat: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लग्नासाठी दुबईत गेली अन् तरुंगात पोहोचली; काय झालं नेमकं जाणून घ्या

Sofia Hayat: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लग्नासाठी दुबईत गेली अन् तरुंगात पोहोचली; काय झालं नेमकं जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 10, 2024 11:34 AM IST

Bigg Boss fem Sofia Hayat: 'मला एका खोलीत नेण्यात आले अन्..', सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने काळीज हेलावणारी घटना सांगितली आहे.

Sofia Hayat Arrested by dubai police
Sofia Hayat Arrested by dubai police

Sofia Hayat in Dubai Jail: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सोफिया हयातसोबत एक धक्कादायक प्रकार घटना घडली आहे. सोफिया ही बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी दुबईला गेली होती. पण विमानतळावर उतरताच तिला पोलिसांनी अटक केली. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सोफियाने याबाबत माहिती दिली आहे.

सोफिया बॉयफ्रेंड मुबारक मोहम्मद अल मेराखीला भेटण्यासाठी दुबईला गेली होती. तेथे जाऊन लग्न करण्याचा बेतात सोफिया होती. मात्र, ३१ डिसेंबर २०२३ रोजी सोफिया दुबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी तिला अटक केली. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सोफियाने याबाबत माहिती दिली आहे.
वाचा: एल्विश यादवने युट्यूबर मॅक्सटर्नला केली बेदम मारहाण, पोलिसात तक्रार दाखल

इन्स्टाग्राम शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सोफिया म्हणाली की, ’३१ डिसेंबर २०१३ रोजी अल उल्ला जात असताना मला अटक करण्यात आली. ही घटना अचानक घडली. मला विमानतळावरच अटक करण्यात येईल याचा मी विचार देखील केला नव्हता. मी ब्रिटीश दुतावासाला फोन करण्यासाठी सांगितले. पण त्यांनी तसे केले नाही. मला अटक का करत आहात… असा प्रश्न मी जेव्हा पोलिसांना विचारला, तेव्हा त्यांनी मला शांत राहण्यासाठी सांगितले. मला ज्याठिकाणी ठेवण्यात आले होते तेथे कोणीच नव्हते. मला आजारी पडल्यासारखे देखील वाटत होते. म्हणून छोट्या खिडकीतून आवाज दिला. पण कोणीच आले नाही. एका तासानंतर अधिकारी आले आणि मला औषधे देऊ लागले. पण मला मी औषधे घेतली नाहीत, कारण मला माहिती नव्हते ते काय आहे.’
वाचा: रुचिरा जाधव म्हणते 'राजा येईल गं', काय आहे नेमकी भानगड?

पुढे सोफिया म्हणाली, ‘६ तास तुरुंगात राहिल्यानंतर, एका महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत मला पिंजऱ्या सारख्या बंद पोलीस व्हॅनमध्ये दुबई पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तेथे पोहोचण्यासाठी जवळपास २५ मिनिटे लागली. मी प्रचंड घाबरले होते. माझ्यासोबत असलेले अधिकार टिकटॉकवर बॉलिवूड व्हिडीओ पाहात होते. जेव्हा दुबई पोलीस स्टेशनमध्ये मी पोहोचले तेव्हा मला एका खोलीत नेण्यात आले. तेथे ४ अधिकारी माझ्यावर ओरडले आणि म्हणाले £5000 (भारतीय चलनानुसार जवळपास ५ लाख ३२ हजार रुपये) एका व्यक्तीकडून बळजबरी करुन घेत आहेस आणि सेक्स व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी त्या व्यक्तीला देत आहेस.. पोलिसांचे आरोप ऐकून मला मोठा धक्का बसला. मी मोठमोठ्याने रडू लागली. माझ्या एक्स बॉयफ्रेंडने माझ्याकडून सुमारे ५ लाख ३२ हजार रुपये घेतले आणि ते पैसे त्याला मला परत करायचे होते. तो पोलिसांसोबत खोट बोलला कारण त्याला माझे पैसे द्यायचे नव्हते…’
वाचा: तो डुकरासारखा खातो… सलमानविषयी अभिनेत्यानं केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा

त्यानंतर पोलिसांनी सोफियाचा मोबाईल घेतला आणि चेक केला. त्यामध्ये त्यांना एक मेसेज सापडला. ज्यामध्ये लिहिले होते की ‘तू मला माझे पैसे दिले नाहीस तर, मी सोशल मीडियावर तुझे पितळ उघडे करेन.' त्यानंतर पोलिसांना सोफियावर विश्वास बसला. त्यांनी सोफियाला सोडले. जवळपास दोन महिने सोफिया तुरुंगात होती.

सोफियाने एक्स बॉयफ्रेंडचा उल्लेख करत व्हिडीओमध्ये म्हटले की, ‘लंडनमध्ये जेव्हा तो उपचारासाठी आला होता. तेव्हा त्याची भेट झाली. त्याने मला लग्नासाठी मागणी घातली आणि म्हणाला लग्नानंतर दुबईत स्वतःचा व्यवसाय सुरु करु. ठरवल्याप्रमाणे काही झालेच नाही, पण तुरुंगात जावे लागले. मला औषधांची गरज होती, पण दुबईत ती ओषधे उपलब्ध नव्हती… तरी देखील मला जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.’

Whats_app_banner
विभाग