Bigg Boss 18: पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस १८’च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार? ‘या’ स्पर्धकाचं टेन्शन वाढणार
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 18: पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस १८’च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार? ‘या’ स्पर्धकाचं टेन्शन वाढणार

Bigg Boss 18: पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस १८’च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार? ‘या’ स्पर्धकाचं टेन्शन वाढणार

Published Oct 08, 2024 09:46 AM IST

Bigg Boss 18 Latest Update: सलमान खानच्या शोमध्ये यावेळी बरेच काही बदल पाहायला मिळणार आहेत. या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकाच्या एन्ट्रीची बातमी येत आहे.

सलमान खान बिग बॉस
सलमान खान बिग बॉस

Bigg Boss 18 Latest Update: ‘बिग बॉस १८’ सुरू होऊन अवघा एक दिवस उलटला असून, या घरात आता पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाच्या एन्ट्रीची चर्चा सुरू झाली आहे. सलमान खानच्या शोमध्ये यावेळी बरेच काही बदलले आहे. यावेळी बिग बॉसने प्रीमिअरमध्येच ‘टॉप २’ फायनलिस्टची घोषणा केली. त्याचबरोबर आता या सीझनच्या पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झाल्याचे म्हटले जात आहे. ‘ही’ स्पर्धक येताच विवियन डिसेनाच्या अडचणी वाढू शकतात. जाणून घेऊया कोण आहे ही स्पर्धक?

कोण असेल ‘ही’ स्पर्धक?

‘बिग बॉस १८’ बाबत मोठी बातमी समोर येत आहे. ‘टेलीचक्कर’च्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री वाहबिज दोराबजी बिग बॉसचा पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून येत आहे. वाहबिज दोराबजी ही दुसरी कोणी नसून, विवियन डिसेना याची पहिली पत्नी आहे. वहाबिजच्या एन्ट्रीमुळे विवियनच्या घरातील अडचणी वाढणार आहेत. वाहबिज दोराबजी घरात येताच विवियनची अनेक रहस्य उलगडणार आहे. या शोमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून वाहबीज दोराबजीच्या एन्ट्रीची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली, तरी तिच्या एन्ट्रीनंतर हा खेळ खूपच रंजक होणार हे निश्चित आहे.

Bigg Boss 18: पहिल्याच दिवशी रेशनवरून वरून झाले वाद; रजत दलालने तजिंदर बग्गाला दिली थेट धमकी!

पहिली पत्नी उलगडणार रहस्य

विवियन डिसेना याचे पहिले लग्न वाहबिज दोराबजी हिच्याशी झाले होते. या दोघांनी ही २००८मध्ये ‘प्यार की एक कहानी’ या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या शोमध्ये विवियनने व्हॅम्पायरची भूमिका साकारली होती. या शोदरम्यान वाहबिज आणि विवियनची लव्हस्टोरी सुरू झाली. २०१३ साली दोघांनी लग्न केलं होतं, पण त्यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही आणि २०२१मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर अभिनेता इजिप्तची पत्रकार नूरन अली हिच्या प्रेमात पडला. २०२२मध्ये दोघांनी गुपचूप लग्न केले होते. त्यांना आता एक मुलगी आहे. तर, अभिनेत्याने स्वतः धर्म देखील बदलला आहे. 

बिग बॉस 18 मध्ये विवियन डिसेना, 'व्हायरल भाभी' हेमा शर्मा, वकील गुणरत्न सदावर्ते, आयशा सिंग, आरफिन खान आणि सारा खान, 'अनुपमा' अभिनेत्री मुस्कान बामणे, फिटनेस इन्फ्लुएंसर रजत दलाल, ‘खतरों के खिलाडी १४’चा विजेता करणवीर मेहरा, अरुणाचल प्रदेशची चुम दरांग, अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर, नायरा बॅनर्जी, श्रुतिका अर्जुन, भाजप नेते तजिंदर पाल सिंह बग्गा, एलिस कौशिक, ईशा सिंह यांनी एन्ट्री केली आहे.

Whats_app_banner