Bigg Boss 18: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस १८' दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. या शोमध्ये आलेले सर्व स्पर्धक आता हळूहळू आपले खरे दाखवत आहेत. सुरुवातीला चांगले मित्र असणारे आता एकमेकांचे दुश्मन झाले आहेत. अलीकडेच 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने स्पर्धकांना जोरदार टोला लगावला आहे. अशातच आता बिग बॉसचा एक नवा प्रोमो समोर आला आहे, जो खूपच मजेदार आहे. या प्रोमोमध्ये भारती आणि कृष्णा अभिषेकची मस्ती पाहायला मिळत आहे. सोबतच मल्लिका शेरावतने नॅशनल टीव्हीवर सलमानला किस केले आहे.
कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बिग बॉस १८'चा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये राजकुमार राव, तृप्ती डिमरी, कृष्णा अभिषेक, भारती सिंह आणि बॉलिवूडची सनसनाटी अभिनेत्री मल्लिका शेरावत सलमान खानच्या शोमध्ये पाहुणे म्हणून पोहोचले असल्याचे दिसत आहेत. सर्वांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाला हजेरी लावली. 'तांडव की रात विथ स्टार्स' असं आजच्या एपिसोडचं नाव आहे.
कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, भारती डोक्यावर ओठणी घेवून वधूच्या भूमिकेत काम उभी आहे. तर कृष्णा अभिषेक सलमानचा बॉडीगार्ड शेराची कॉपी करताना आणि भारतीला अभिनेत्यापासून दूर नेण्याविषयी बोलताना दिसत आहे. भारती व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे की, 'याच्यामुळेच तुझे लग्न होत नाही.' हे ऐकताच सलमान जोरजोरात हसायला लागतो. तसेच बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना देखील हसू अनावर होते. भारती आणि अभिषेक यांचा हा ड्रामा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
वाचा: दीपिकापेक्षा करीनाने घेतली जास्त फी, वाचा ‘सिंघम अगेन’मधील कलाकारांच्या मानधनाविषयी
पुढे प्रोमोमध्ये तृप्ती डिमरी गुणरत्न सदावर्तेला प्रश्न विचारते की, तुम्ही कोर्टातपण अशा प्रकारेच बोलत का? त्यावर उत्तर देत गुणरत्न म्हणतो, 'पुढच्या तारखेच्या वेळी माझी भूमिका नक्की पाहा.' ते ऐकून तृप्ती त्यांच्याच स्टाईलमध्ये जरुर असे बोलतो. त्यानंतर मल्लिका शेरावत सलमानला म्हणते, 'हम बनाते हैं ना हमारा वो वाला व्हिडीओ.' त्यानंतर मल्लिका सलमानला मिठी मारते आणि गालावर किस करते. त्यावेळी सलमान थोडा लाजतो. आता हे सर्व आजच्या भागात पाहिल्यावर प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहण्यासारखे आहे.
संबंधित बातम्या