Bigg Boss 18 Tops 5 Contestants : ‘बिग बॉस १८’मध्ये नुकताच ३ वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. दरम्यान, या आठवड्यातील लोकप्रिय स्पर्धकांची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. १४ स्पर्धकांमध्ये रजत दलाल पुन्हा अव्वल स्थानी आला आहे. वाईल्ड कार्ड स्पर्धक दिग्विजय राठी आणि कशिश कपूर देखील ‘टॉप ५’च्या यादीत आहेत. ही यादी पाहून फिनालेमध्ये ‘टॉप ३’ कोण असेल याचा अंदाज लोक बांधत आहेत.
रजत दलाल बिग बॉस शोच्या प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याच्यात आणि करणवीर मेहरा यांच्यात तगडी स्पर्धा आहे. एक्स हँडलने बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांच्या लोकप्रियतेवर आधारित एका पोलचे निकाल शेअर केले आहेत. यात सहाव्या आठवड्यात घरात कोण सर्वाधिक चर्चेत आहे, याची यादी देण्यात आली आहे. रजत दलाल, करणवीर , विवियन, कशिश आणि चाहत पांडे फिनालेपर्यंत ‘टॉप ५’मध्ये असू शकतात असा अंदाज लोकांनी बांधला आहे.
१. रजत दलाल - ३९९५
२. करणवीर मेहरा - ३५९८
३. विवियन डीसेना - ३०८३
४. दिग्विजय राठी - २४५०
५. कशिश कपूर - १८३५
६. चाहत पांडेय - १५५०
७. अविनाश मिश्रा - १२४३
८. चुम दारंग - ११७६
९. ईशा सिंह - ५३५
१०. श्रुतिका अर्जुन - ५२७
११. एलिस कौशिक - ३६९
१२. सारा अरफीन खान - ३६१
१३. तेजिंदर बग्गा - १५७
१४. शिल्पा शिरोडकर - ९२
या मतांमध्ये करणवीरचे २००० आणि रजतचे ३००० बॉट्स लाईक्स वजा करण्यात आले आहेत.
या पोलच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक लिहित आहेत की, अर्ध्या घरात कशिश कपूर आणि वाईल्ड कार्ड दिग्विजय राठी यांचे वर्चस्व आहे. एकाने लिहिलं की, ‘फिनालेपर्यंत असंच राहिलं तर मजा येईल.’ एक कमेंट अशी आहे की, ‘रजत आणि करणवीर टॉप २ साठी पात्र आहेत, यात शंका नाही.’ एकाने लिहिले आहे की, ‘अविनाश टॉप ५साठी पात्र आहे.’ तर, एक कमेंट अशी आहे की, ‘एलिस आणि शिल्पा बॉटम २मध्येच राहतील.’ सध्या बिग बॉस १८च्या घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये फायनलपर्यंत पोहोचण्याची चुरस रंगली आहे.