Bigg Boss 18 Weekend Ka Vaar : ‘बिग बॉस सीझन १८’च्या प्रत्येक एपिसोडमध्ये ड्रामा वाढत चालला आहे. सीझनच्या सुरुवातीपासूनच स्पर्धक बिग बॉसच्या घरात भांडणाच्या मूडमध्ये दिसत आहेत. या आठवड्यात घरात अनेक वेळा धमाल पाहायला मिळाली आहे. त्यानंतर आता प्रेक्षक ‘वीकेंड का वार’ची वाट पाहत आहेत. वीकेंडला सलमान खान येऊन या घरातील सगळ्या स्पर्धकांची शाळा घेईल, याची लोक वाट पाहत आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव सलमान खान ‘वीकेंड का वार’चे शूटिंग करणार नसल्याची बातमी समोर येत आहे.
बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरच्या रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी हे सलमान खानचे जवळचे मानले जात होते. इतकंच नाही, तर लॉरेन्स बिश्नोईने याआधी सलमान खानला धमकीही दिली आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याच कारणामुळे सलमान खान यावेळी ‘वीकेंड का वार’चे शूटिंग करणार नाही.
फिल्मीबीटच्या रिपोर्टनुसार, सलमान खान वीकेंड का वार एपिसोडशूट करणार नसल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. ‘वीकेंड के वार’चे शूटिंग उद्या म्हणजेच १८ ऑक्टोबरला होणार आहे.
जर, सलमान खानने ‘वीकेंड का वार’चे शूटिंग केले नाही, तरी ही पहिलीच वेळ नाही. याआधीच्या सीझनमध्ये सलमान खान अनेकदा कामामुळे वीकेंड वॉरचं शूटिंग करू शकला नव्हता. तेव्हा त्याच्या जागी फराह खान किंवा करण जोहर शूटिंगसाठी यायचे. मात्र, यावेळी बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर ‘वीकेंड का वार’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये दिसण्याची शक्यता आहे. अनिल कपूर यांनी 'बिग बॉस ओटीटी ३' होस्ट केले.
सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली असून, यात त्याच्या सुरक्षेसाठी आठ ते दहा पोलिसांची तुकडी बंदुकांसह त्याच्या घराबाहेर तैनात करण्यात आली आहे. यापैकी काही पोलीस त्याच्यासोबत सगळीकडे जातील. सलमान खान कुठल्याही ठिकाणी जाण्यापूर्वी त्या ठिकाणची सुरक्षा तपासणी केली जाईल. सलमान खानच्या घराच्या चारही बाजूंना पोलीस तैनात करण्यात आले आहेत.