Bigg Boss 18 : लग्नाआधीच गरोदर, दुसऱ्या पतीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न; ‘बिग बॉस’ची 'व्हायरल भाभी' पुन्हा चर्चेत!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 18 : लग्नाआधीच गरोदर, दुसऱ्या पतीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न; ‘बिग बॉस’ची 'व्हायरल भाभी' पुन्हा चर्चेत!

Bigg Boss 18 : लग्नाआधीच गरोदर, दुसऱ्या पतीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न; ‘बिग बॉस’ची 'व्हायरल भाभी' पुन्हा चर्चेत!

Published Oct 24, 2024 12:31 PM IST

Viral Bhabhi Hema Sharma : ‘बिग बॉस १८’ची स्पर्धक हेमा शर्मा आणि तिचा पती गौरव शर्मा यांच्यातील वाद आता सर्वांसमोर आले आहेत. दोघेही एकमेकांवर अनेक आरोप करत आहेत. आता गौरवने हेमासोबत लग्न का केलं हे सांगितलं आहे.

Hema Sharma : हेमा शर्मा
Hema Sharma : हेमा शर्मा

Bigg Boss 18 Viral Bhabhi Hema Sharma : ‘बिग बॉस १८’च्या घरातून व्हायरल भाभी म्हणजेच हेमा शर्मा बाहेर पडली आहे. हेमा ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारी पहिली स्पर्धक ठरली. आधीच वादांमुळे चर्चेत असलेल्या हेमा शर्माच्या आयुष्यात आणखी एका वादाची भर पडली आहे. आता तिचे पती गौरव सक्सेना यांनी हेमावर काही गंभीर आरोप केले आहेत. हेमा आणि गौरव विभक्त झाले आहेत. एका मुलाखतीदरम्यान गौरवने सांगितले की, एका मॅट्रिमोनियल साईटवर त्यांची आणि हेमाची भेट झाली होती. ती आधीच गरोदर असल्याने तिचे बॅकग्राऊंड चेक न करताच लग्न करावे लागले. हेमा फक्त त्यांचा पैशांसाठी वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेमा शर्मा यांच्यापासून विभक्त झालेल्या गौरव सक्सेना यांनी लग्न केल्याची खंत वाटत असल्याचे म्हटले आहे. टेलिचक्करशी संवाद साधताना गौरवला जेव्हा विचारण्यात आलं की, जेव्हा लोक त्यांना व्हायरल भाभीचा नवरा म्हणतात तेव्हा त्यांना कसं वाटतं? त्यावर गौरव म्हणाले की, ‘खरं सांगायचं तर अजिबात चांगलं वाटत नाही. तिला हे नाव कसं मिळालं आणि कुठून आलं हे सगळ्यांनाच माहीत आहे, त्यामुळे ही ओळख नकोशीच वाटते.’

Bigg Boss 18 : सलमान खानचा जीव धोक्यात; ‘बिग बॉस १८’च्या घरालाही बसणार मोठा फटका! ‘वीकेंड का वार’चं काय होणार?

हेमा लग्नाआधीच होती गरोदर

गौरव म्हणाले की, '२०२०मध्ये आम्ही एका लग्न जुळावणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून भेटलो होतो. त्यावेळी हेमाने सांगितले की, ती सिंगल मदर आहे. तिचा पहिला नवरा तिच्यावर अत्याचार करायचा. हेमा आणि तिच्या मुलाला तो बेदम मारहाण करायचा. माझी या लग्नाच्या बाबतीत थोडी घाई झाली. या उतावीळपणाचं कारण होतं माझं मूल. ऑक्टोबरमध्ये मी तिला पहिल्यांदा भेटलो आणि नोव्हेंबरमध्ये ती गर्भवती झाली. तिच्या पोटात माझं बाळ होतं. त्यावेळी कशाचाही विचार करायला मला वेळ नव्हता. मला वाटलं यात माझ्या मुलाचा काय दोष. भारतीय संस्कृतीनुसार मी तिच्याशी लग्न करण्याआधी बाळ जन्माला आले तर,  तिची बदनामी होऊ शकते, हे मी जाणून होतो. म्हणूनच आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि जानेवारी २०२२मध्ये लग्न केले. पण आता ती मुलाच्या बदल्यात माझ्याकडून २.५ कोटी रुपये मागत आहे.

दोघांमध्ये सुरू झाले वाद!

दोघांमध्ये वाद केव्हा सुरू झाले, याबद्दल सांगताना गौरव सक्सेना म्हणाले की, ‘यावर्षी मार्चपासून परिस्थिती बिघडत चालली होती. गेल्या वर्षी ती युगांडाला आली होती. आम्ही तीन महिने एकत्र होतो. जानेवारी २०२३मध्ये मी तिच्या यूट्यूब चॅनेलवर काम केलं. पैसे मिळाल्यावर ती म्हणू लागली की, इथे रिसोर्सेस कमी आहेत, मला मुंबईला जाऊन करिअर करायचे आहे. या दरम्यान मी तिच्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पैशांसाठी ती फक्त माझा वापर करत होती.’

Whats_app_banner