Bigg Boss 18 : शेवटचा आठवडा अन् सगळेच स्पर्धक झाले नॉमिनेट! कधीपर्यंत मत देता येणार? जाणून घ्या...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 18 : शेवटचा आठवडा अन् सगळेच स्पर्धक झाले नॉमिनेट! कधीपर्यंत मत देता येणार? जाणून घ्या...

Bigg Boss 18 : शेवटचा आठवडा अन् सगळेच स्पर्धक झाले नॉमिनेट! कधीपर्यंत मत देता येणार? जाणून घ्या...

Jan 14, 2025 08:54 AM IST

Bigg Boss 18 Finale Week : या घरात मिडवीक एविक्शन लवकरच जाहीर होईल. शेवटच्या आठवड्यात शोमध्ये उपस्थित असलेल्या सातही स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आले आहे.

शेवटचा आठवडा अन् सगळेच स्पर्धक झाले नॉमिनेट! कधीपर्यंत मत देता येणार? जाणून घ्या...
शेवटचा आठवडा अन् सगळेच स्पर्धक झाले नॉमिनेट! कधीपर्यंत मत देता येणार? जाणून घ्या...

Bigg Boss 18 Nominations : 'बिग बॉस १८' या लोकप्रिय शोचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे.आता शेवटच्या ४ दिवसांत देखील प्रेक्षकांना आणि स्पर्धकांना काही ट्वीस्ट पाहायला मिळणार आहेत. आता घरात फिनाले वीकच्या शेवटच्या मिड वीक एविक्शनसाठी काउंटडाउन सुरू झाले आहे. शेवटच्या नॉमिनेशनमध्ये घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले आहे. मात्र,आता आपल्या आवडत्या स्पर्धकाला वाचवण्याची आणि या खेळात टिकवून ठेवण्याची संधी फार कमी वेळासाठी मिळणार आहे. या शोच्या वोटिंग लाईन्स उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. त्यामुळे आता घरातील काही स्पर्धकांना मंगळवारी रात्री किंवा बुधवारी मध्यरात्री बेघर केले जाऊ शकते. फिनाले वीकमध्ये सध्या या घरात ७ सदस्य आहेत. करणवीर, विवियन, शिल्पा, चुम, ईशा, अविनाश आणि रजत हे फिनाले वीकमध्ये आहेत. सध्या शिल्पा आणि ईशाला लोकप्रियतेच्या मानाने कमी मते मिळत आहेत.

आता या घरात मिडवीक एविक्शन लवकरच जाहीर होईल. शेवटच्या आठवड्यात शोमध्ये उपस्थित असलेल्या सातही स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आले आहे. उद्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाच्या संधी खुल्या राहतील. आता या शोमधून कोणाला बाहेर काढलं जातं, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. मात्र, लोकप्रियतेच्या जोरावर शिल्पा आणि ईशाला कमी मते मिळत आहेत. तर, नुकतीच चाहत पांडे शोमधून बाहेर पडली आहे.

Viral Video: उर्वशी रौतेलासोबत ६४ वर्षीय सुपरस्टारने केली अश्लील स्टेप, व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी

करणने 'टॉप ५'मध्ये कुणाची नावं घेतली?

फिनालेपूर्वी करणने त्याच्या टॉप ५ स्पर्धकांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत विवियन, शिल्पा, चुम आणि अविनाश यांची नावे आहेत, तर रजत दलाल आणि ईशा सिंग यांची नावे नाहीत. या शोचा ग्रँड फिनाले १९ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. शोमध्ये उपस्थित स्पर्धक रजत दलाल, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर, ईशा सिंग, चुम दरंग आणि करणवीर मेहरा यांच्यात 'टॉप ५'साठी लढाई सुरू झाली आहे.

दाखवली शोच्या ट्रॉफीची झलक!

बिग बॉसच्या १८व्या सीझनच्या ट्रॉफीची पहिली झलक फिनाले आठवड्यात समोर आली आहे. निर्मात्यांनी प्रोमो व्हिडिओमध्ये ट्रॉफीची झलक दाखवली आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये सलमान शोच्या ग्रँड फिनालेची तारीख आणि वेळ सांगतानाही दिसत आहे. आता शोच्या १८व्या सीझनच्या ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Whats_app_banner