Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांना बसला मोठा धक्का; अचानक झालेल्या ‘मिड वीक एविक्शन’मध्ये कोण गेलं बाहेर?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांना बसला मोठा धक्का; अचानक झालेल्या ‘मिड वीक एविक्शन’मध्ये कोण गेलं बाहेर?

Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांना बसला मोठा धक्का; अचानक झालेल्या ‘मिड वीक एविक्शन’मध्ये कोण गेलं बाहेर?

Oct 16, 2024 08:54 AM IST

Bigg Boss 18 Mid Week Eviction : 'बिग बॉस १८'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस रेशनच्या बदल्यात कुटुंबातील दोन सदस्यांना तुरुंगात पाठवण्याचा किंवा एका सदस्याला बेघर करण्याचा पर्याय देताना दिसले आहेत.

बिग बॉस 18
बिग बॉस 18

Bigg Boss 18 Mid Week Eviction :  छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त शो'बिग बॉस १८'ला जोरदार सुरुवात झाली आहे. या घरात रोजच काही ना काही कारणांनी वाद होताना पाहायला मिळतात. मात्र, आता स्पर्धकांना धक्का बसताना दिसणार आहे. ‘बिग बॉस १८’च्या घरात आता ‘मिड वीक एलिमिनेशन’ होणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनुसार, बिग बॉसने रेशन मिळवण्याच्या बदल्यात घरातील स्पर्धकांना दोन पर्याय दिले आहे. बिग बॉस म्हणतात की, 'संपूर्ण कुटुंबाला घरात रेशन मिळावं आणि तुमचं भविष्य चांगलं असावं, असं तुम्हाला वाटत असेल तर कुटुंबातील दोन सदस्यांना आत्ताच तुरुंगात डांबून ठेवावं लागेल किंवा नॉमिनेट सदस्यांपैकी एकाला या वेळी घराबाहेर काढावं लागेल.'

बिग बॉसचे हे पर्याय ऐकल्यानंतर घरातील सदस्य पहिला पर्याय निवडतात. त्यांनी दोन सदस्यांना तुरुंगात डांबण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना एक स्पर्धक म्हणतो की, 'अविनाशने तुरुंगात जावं अशी आमची इच्छा आहे. हे बोलणं ऐकून आरफीन काहीतरी बोलतो आणि मग दोघांमध्ये वाद  सुरू होतात. अविनाश म्हणतो की, ‘एकटं बोलायची कुणाची हिंमत नसते, मी बोलतो, मग सगळे पुढे ओरडायला येतात.’

Bigg Boss 18 : ‘बिग बॉस १८’ला मिळाला पहिला ‘टाईम गॉड’! कुणाच्या हाती आले विशेष अधिकार?

अविनाश मिश्रा जाणार बाहेर?

यावेळी चुम दरांग अभिनेता अविनाश मिश्राला शांत करण्याचा प्रयत्न करते. परंतु जेव्हा अविनाश तिचे ऐकत नाही, तेव्हा ती  अरफीनला समजावण्याचा प्रयत्न करते. अविनाश संतापून चुमला म्हणतो, ‘माझ्याशी बोल, त्यांच्याशी बोलू नकोस.’ तेव्हा चुमला आपला राग अनावर होतो आणि ती म्हणते की, 'मी तुझ्याशी बोलतेय, पण माझं कुठे ऐकत आहेस!.' यानंतर अविनाशचा राग उफाळून येतो. अविनाश भयंकर चिडतो.  अविनाशचे हे रूप पाहिल्यानंतर रजत दलाल म्हणतो की, ‘जो मार्ग आम्ही निवडला नाही, तो आमचा निर्णय चुकला होता. त्याच्या या वागणुकीनंतर आम्हाला एलिमिनेशनचा मार्ग निवडणे योग्य वाटते आहे. अविनाशच्या एलिमिनेशन बाजूने आमच्याकडे १० मते आहेत.’ त्यानंतर बिग बॉस अविनाशला घराबाहेर पडण्याचा आदेश देतात. पाहा प्रोमो.

दोन सदस्य झाले एलिमिनेट

यापूर्वी, बिग बॉस १८ च्या घरातून दोन सदस्यांना बाहेर काढण्यात आले होते, ज्यात गधराज आणि गुणरत्न सदावर्ते यांचा समावेश आहे. अलीकडेच 'बिग बॉस'ने गुणरत्न सदावर्ते यांना कन्फेशन रुममध्ये बोलावून काही काळासाठी घराबाहेर जाण्याची परवानगी देत ​​असल्याचे सांगितले. कारण कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात त्यांना हजर राहावे लागणार आहे.

Whats_app_banner