Bigg Boss 18 Gunratan Sadavarte : ‘बिग बॉस १८’ सुरू झाल्यापासून, शोमध्ये आतापर्यंत अनेक रंजक ट्विस्ट आले आहेत. पहिल्याच दिवशी'व्हायरल भाभी' हेमा शर्मा आणि तजिंदर पाल सिंह बग्गा यांना घरातील जेलमध्ये टाकण्यात आले होते. यानंतर नॉमिनेशनच्या टास्कमध्ये स्पर्धकांनी एकमेकांवर चिखलफेक देखील केली. आता एका स्पर्धकाने बिग बॉस या कार्यक्रमादरम्यान नॅशनल टीव्हीवर धमकी दिली आहे. हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून, स्वतः वकील गुणरत्न सदावर्ते आहेत, ज्यांनी बिग बॉसचा आदेश स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. धमकी देताना ते म्हणाले की, सरकारही मला घाबरतं आणि दाऊद इब्राहिमलाही माझी भीती वाटते.
नव्या भागामध्ये बिग बॉसने सर्व स्पर्धकांना लिव्हिंग एरियामध्ये बोलावले आणि कुटुंबातील सदस्यांचे बोलणे ऐकून घेऊन हेमा शर्मा आणि तजिंदर पाल सिंह बग्गा यांना तुरुंगातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बिग बॉस म्हणाले की, तुरुंग कधीही रिकामे राहू शकत नाही. त्यामुळे त्यांनी अविनाश मिश्रा, ईशा सिंह आणि करणवीर मेहरा यांना तुरुंगात पाठवल्या जाणाऱ्या एका सदस्याचे नाव घेण्यास सांगितले.
परस्पर संमतीनंतर करणवीर याने गुणरत्न सदावर्ते यांचे नाव घेतले. आपले नाव ऐकताच गुणरत्न च्नाग्लेच संतापले. शोदरम्यान त्यांचा असा अवतार दिसला की, घरातील सदस्यही आश्चर्यचकित झाले. गुणरत्न म्हणाले, 'मला हा निर्णय मान्य नाही. मी जेलमध्ये जाणार नाही. मी आत्ताच खेळ सोडेन. प्रश्न अत्याचाराचा नाही, भूमिकेचा आहे, अशी भूमिका आम्ही न्यायालयात मांडतो. नॅशनल टीव्हीवर सांगतो की आजपासून मी अन्न आणि पाणी सोडले आहे.’
गुणरत्न सदावर्ते यांचे हे बोलणे ऐकून बिग बॉसला राग आला आणि त्यांनी आपला निर्णय कायम असल्याचे म्हटले. यावर गुणरत्न म्हणली की, 'मला तुरुंगात जाणे मान्य नाही.' कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते त्यांच्यावरच ओरडत म्हणाले की, 'मी जेलमध्ये जाणार नाही... सरकार मला घाबरते... दाऊद इब्राहिम मला घाबरतो.' असे बोलून त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला.’
गुणरत्न सदावर्ते यांनी ‘बिग बॉस१८’मध्ये येण्याच्या एक दिवस आधी त्यांना कराचीतून धमकीचा फोन आला होता, असे म्हटले होते.महाराष्ट्रात फक्त एकनाथ शिंदे, शरद पवार आणि ते तीन लोकच ताकदवान आहेत, असेही ते म्हणाले.गुणरत्न सदावर्ते हे सुप्रीम कोर्टाचे प्रसिद्ध वकील आहेत. त्यांनी बिग बॉस१८मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश केला आहे. मात्र, शोमधील त्याची व्यक्तिरेखाही खूपच मनोरंजक आहे.