Bigg Boss 18 Bottom 5 Contestants : 'बिग बॉस सीझन १८' सध्या जोशात सुरू आहे. चाहते या शोशी पूर्णपणे जोडले गेले आहेत. आता या शोमध्ये प्रत्येकाचे खरे व्यक्तिमत्व समोर येऊ लागले आहे. जुने स्पर्धक असोत वा वाईल्ड कार्ड, प्रत्येकाने या गेममध्ये आता धमकेदार खेळ दाखवायला सुरुवात आहे. तरीही, शोमध्ये असे अनेक चेहरे आहेत जे इतर स्पर्धकांच्या तुलनेत थोडे हलके वाटतात. आता या शोचे ‘बॉटम ५’ स्पर्धक समोर आले आहेत. जाणून घेऊया कोण आहेत ‘हे’ स्पर्धक...
या शोमध्ये सारा काही खास करताना दिसत नाही. नॉमिनेट झाल्यावरच ती सक्रिय होते आणि नर्व्हस होऊन इतरांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करते. अलीकडेच तिने करण वीर मेहराच्या चेहऱ्यावर पाणी फेकले होते आणि त्याआधी तिने विवियन डिसेना आणि ईशा सिंहसोबत हिंसाचार केला होता. याशिवाय, संपूर्ण शोमध्ये तिने काहीही केले नाही, त्यामुळे लोक तिला व्होटिंग करण्यास कचरतात.
जेव्हा कशिश कपूर वाईल्ड कार्ड म्हणून या घरात आली, तेव्हा वाटलं होतं की, ती शोमध्ये आग लावेल, पण ती एक ठिणगी ठरली, जी एकदा जळली आणि विरून गेली. तिची मैत्री किंवा वैर कुणाशीही कायम राहिलेले नाही. जर ती घरात कुणाशी खरे नाते निर्माण करू शकले नाही, तर जनतेला ती का आवडेल? यामुळेच कशिशही बॉटम पाचमध्ये सामील झाली आहे.
तजिंदर बग्गा नशिबाच्या जोरावर आतापर्यंत शोमध्ये पुढे जात आहे. चहा व्यतिरिक्त तो कशाचाही विचार करत नाही आणि बोलत नाही. अशा परिस्थितीत, शोमध्ये त्याचे शून्य योगदान पाहून चाहत्यांना देखील कंटाळला आहे. जर त्याला नामांकन मिळाले, तर तो शो मधून बाहेर पडण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
अदिती मिस्त्री ‘बिग बॉस १८’मधील सर्वात फ्लॉप स्पर्धक आहे. शोमध्ये तिच्या उपस्थितीचा कोणताही फायदा शोला होत नाही आणि प्रेक्षकांचेही मनोरंजन होत नाहीये. फक्त तिचे शरीर पाहून लोक त्यावर कमेंट करतात आणि सगळे खोटे असल्याचा अंदाज लावतात. यापलीकडे तिची कोणतीही चर्चा नाही.
चुम दरंग हिचे व्यक्तिमत्त्व जितके गोड आहे, तितकीच ती ताकदवान आहे. ती कमी बोलते पण तिची भूमिका स्पष्ट आहे. चुम देखील टास्कमध्ये चांगली कामगिरी करते. परंतु, बहुतेक भागांमध्ये ती गायब असल्याचे दिसते आणि तिचे मौन हे तिचे ‘बॉटम ५’मध्ये असण्याचे कारण आहे. कदाचित याच कारणामुळे श्रुतिकाने चुमला नॉमिनेट करून वाचवले.