Bigg Boss 18: ‘बिग बॉस १८’च्या घरात होणार एकता कपूरचा तांडव! स्पर्धकांना वाचवायला सलमानही नसणार
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 18: ‘बिग बॉस १८’च्या घरात होणार एकता कपूरचा तांडव! स्पर्धकांना वाचवायला सलमानही नसणार

Bigg Boss 18: ‘बिग बॉस १८’च्या घरात होणार एकता कपूरचा तांडव! स्पर्धकांना वाचवायला सलमानही नसणार

Nov 08, 2024 11:54 AM IST

Bigg Boss 18 Latest Update Weekend Ka Vaar : या आठवड्यात चाहत्यांनाही धक्का बसू शकतो. कारण आज वीकेंड का वारमध्ये सलमान नव्हे तर, एकता कपूर घरातील सदस्यांना रिॲलिटी चेक देताना दिसणार आहे.

Bigg Boss 18 Latest Update
Bigg Boss 18 Latest Update

Bigg Boss 18 Latest Update : सलमान खानचा रिॲलिटी शो 'बिग बॉस १८' प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या आठवड्यात घरातील सदस्यांमध्ये बरेच भांडण पाहायला मिळाले. यामुळेच प्रेक्षकही वीकेंड का वारची आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून सलमान खान त्याच्या कुटुंबातील सदस्यांची शाळा घेताना दिसत होता. मात्र,या आठवड्यात चाहत्यांना धक्का बसू शकतो कारण आज रात्री वीकेंड का वारमध्ये सलमान नव्हे तर टीव्ही क्वीन एकता कपूर घरातील सदस्यांना रिॲलिटी चेक देताना दिसणार आहे. अलीकडेच, शोशी संबंधित एक प्रोमो सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एकता कपूर विवियन डीसेना आणि रजत दलाल यांची शाळा घेताना दिसली आहे.

बिग बॉसशी संबंधित लेटेस्ट अपडेट्स देणारे फॅन पेज बिग बॉस'द खबरी'ने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एकता कपूर वीकेंड का वार होस्ट करताना दिसत आहे. यादरम्यान तिने प्रथम विवियन डिसेनावर तोफ डागली. अभिनेत्याची शाळा घेत एकता कपूर म्हणाली की,'विवियन, मी तुला लॉन्च केले आहे, म्हणून मला तुला काही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. जर तू८-१० वर्षे काम केले आहेस तर… मग घरातील प्रत्येकाने तुला डोक्यावर बसवून घ्यावे का?

एकता कपूर चिडली!

एकता कपूरचे म्हणणे ऐकल्यानंतर विवियन डिसेना म्हणाला की, त्याने कुणालाही असे कधीच काही सांगितले नाही. यावर एकता कपूर त्याच्यावर चिडते आणि म्हणते की, 'मग तू तुझ्या कामाचा अभिमान कोणाला दाखवतो आहेस? विवियन घरातील सगळ्यांपासून आणि संवादापासून दूर राहतो. तुला तेच करायचं होतं तर, तू८ वर्षांनंतर बिग बॉसच्या घरात का आलास? मला हा मुद्दा मांडायचा आहे, कारण तो मुद्दा मला खूपच त्रास देत आहे.’

कधीच घाबरून काम करत नाही, कारण मी हिंदू आहे; धर्माची खिल्ली उडवणाऱ्यांवर संतापली एकता कपूर!

यानंतर एकता चाहत पांडेला टार्गेट केले आणि म्हणाली की, 'तो नॅशनल टीव्हीवर एका मुलीशी असे बोलला. पण तू माझ्याशी असे का बोलत आहेस, मी एक मुलगी आहे असं म्हटलीस. मी तुला सांगू इच्छिते की, इथे तू इथे मुलगी नाही स्पर्धक आहेस. तुम्ही सगळ्या महिलांसाठी बोललात, पण फक्त स्वतःसाठी लढलात.’

टीव्ही क्वीनही रजत दलालवर भडकली!

यानंतर एकता कपूरनेही रजत दलालचा क्लास सुरू केला. ते रजतला म्हणाली, 'अविनाश तुझ्यापेक्षा लहान आहे का की, तू त्याच्यासमोर उभा राहून छाती फुगवून दाखवतोस... तू या घरात असा काही मोठा झेंडा रोवत नाहीयेस आहात, फक्त तुझा दबाव दाखवतो आहेस. आज जर तुम्ही माझ्या वडिलांचे नाव घेतले असते, तर याचा अर्थ काय ते तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी थेट घरात आले असते.’ प्रोमो पाहिल्यानंतर, घरातील सदस्यही वीकेंड का वारसाठी खूप उत्सुक आहेत.

Whats_app_banner