Bigg Boss 18 : विवियन आणि अविनाशवर एलिमिनेशची टांगती तलवार; ‘या’ आठवड्यात कोण होणार घराबाहेर?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 18 : विवियन आणि अविनाशवर एलिमिनेशची टांगती तलवार; ‘या’ आठवड्यात कोण होणार घराबाहेर?

Bigg Boss 18 : विवियन आणि अविनाशवर एलिमिनेशची टांगती तलवार; ‘या’ आठवड्यात कोण होणार घराबाहेर?

Oct 22, 2024 02:36 PM IST

Bigg Boss 18 Latest Update : विवियन डिसेना आणि अविनाश सह रजत दलाल देखील या आठवड्यात डेंजर झोनमध्ये आहेत. नुकतीच या आठवड्याची नॉमिनेशन लिस्ट समोर आली आहे.

बिग बॉस 18 नॉमिनेशन्स
बिग बॉस 18 नॉमिनेशन्स

Bigg Boss 18 : लोकप्रिय रियॅलिटी टीव्ही शो ‘बिग बॉस १८’चा प्रवास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा अॅक्शन आणि ड्रामा वाढत चालला आहे. काही स्पर्धकांमध्ये आता दुरावा निर्माण होऊ लागला आहे. तर, काही स्पर्धक मजेशीर घटकांच्या मदतीने खेळात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन आठवड्यात दोन स्पर्धक बेघर झाले असून, आता तिसऱ्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या रियॅलिटी टीव्ही शो ‘बिग बॉस १८’चा तिसरा आठवडा आता संपत आला आहे. लवकरच आता या घरातून आणखी एक स्पर्धक बाहेर पडणार आहे.

बिग बॉसशी संबंधित बातम्या शेअर करणाऱ्या ‘खबरी’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, विवियन डिसेना, मुस्कान बामणे, नायरा एम बॅनर्जी, रजत दलाल आणि अविनाश मिश्रा यांना या आठवड्यात नॉमिनेट करण्यात आले आहे. पोस्टच्या शेवटी विचारण्यात आले आहे की, तुमच्या मते कोणाला बाहेर काढले जावे? कमेंट सेक्शनमध्ये बहुतांश लोकांनी मुस्कान बामणे आणि नायरा एम बॅनर्जी यांची नावे घेतली आहेत. कारण बिग बॉसच्या या सीझनमध्ये मुस्कान आणि नायरा सर्वात कमी टीव्हीवर दिसल्या आहेत.

सगळ्यात कमजोर स्पर्धक

बिग बॉसच्या घरात ही मुस्कान काहीही न बोलल्याने सतत ट्रोल होत आहे. लाफ्टर शेफची टीम जेव्हा शोमध्ये आली तेव्हा कृष्णा अभिषेकने मुस्कानला रोस्ट केले होते. तेव्हा, तो मुस्कानला उद्देशून म्हणाला की, संपूर्ण देशाला आशा आहे की मुस्कान एक दिवस बोलेल. नायरादेखील एपिसोडमध्ये कधीतरीच दिसत आहे आणि बहुतेक वेळा ती देखील गप्प बसते. दरम्यान, अविनाश, रजत आणि विवियन डिसेना अजूनही या शोमध्ये खूप अॅक्टिव्ह आहेत आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. नव्या प्रोमो व्हिडीओमध्ये श्रुतिका आणि अविनाशचं भांडणही दाखवण्यात आलं आहे.

बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार?

या आठवड्यात श्रुतिकाकडे नॉमिनेशन्सचा ताबा दिला जाणार आहे. यावेळी ती अविनाशचं नाव घेणार आहे. ती म्हणेल की, इतरांचा अवमान करणं हा अतिशय वाईट दृष्टिकोन आहे. या गोष्टीवर अविनाश रागावेल आणि त्याचा श्रुतिकासोबत वाद होईल. साहजिकच या आठवड्यात पाच खेळाडूंच्या डोक्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार असणार आहे. पण, ‘बिग बॉस १८’मधील कोणाचा प्रवास या आठवड्यात  संपणार हे पाहावं लागेल. बिश्नोई गँगच्या धमक्यांमध्ये सलमान खानचं पुढच्या आठवड्यातील ‘वीकेंड का वॉर’ होस्ट करणंही कठीण वाटत आहे.

Whats_app_banner