Bigg Boss 18 : अश्नीर ग्रोव्हरचा टोन ऐकून सलमानचा पारा चढला; बिग बॉसच्या मंचावरच अभिनेत्याने आवाज चढवला!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 18 : अश्नीर ग्रोव्हरचा टोन ऐकून सलमानचा पारा चढला; बिग बॉसच्या मंचावरच अभिनेत्याने आवाज चढवला!

Bigg Boss 18 : अश्नीर ग्रोव्हरचा टोन ऐकून सलमानचा पारा चढला; बिग बॉसच्या मंचावरच अभिनेत्याने आवाज चढवला!

Nov 16, 2024 10:42 AM IST

Bigg Boss 18 Latest Update : येणारा ‘वीकेंड का वार’ खूप स्फोटक असणार आहे. सलमान खान पुन्हा एकदा सदस्यांची शाळा घ्यायला येणार आहे. नुकताच एक प्रोमो समोर आला आहे, ज्यात सलमानचा खतरनाक राग पाहायला मिळत आहे.

Bigg Boss 18 Latest Update
Bigg Boss 18 Latest Update

Bigg Boss 18 Latest Update : ‘बिग बॉस १८’च्या या ‘वीकेंड का वार’मध्ये पुन्हा एकदा सलमान खान धमाकेदार पुनरागमन करणार आहे. सलमान यावेळी दोन आठवड्याची कमी भरून काढताना दिसणार आहे. कुटुंबातील सदस्यांकडून तो त्यांच्या प्रत्येक कामाचा हिशेब घेताना दिसणार आहे. ‘वीकेंड का वार’चा नवा प्रोमो समोर आला आहे, जो खूपच धमाकेदार आहे. कदाचित पहिल्यांदाच सलमान या शोमधील पाहुण्यालाही ओरडताना दिसणार आहे. यावेळी शोमध्ये ‘शार्क टँक इंडिया’ फेम आणि ‘भारत पे’ फेम अश्नीर ग्रोव्हरवर आवाज चढवताना दिसणार  आहे. अश्नीरच्या बोलण्याच्या टोन ऐकून सलमान चिडताना दिसणार आहे.

‘बिग बॉस १८’च्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान ‘शार्क टँक इंडिया’ फेम अश्नीर ग्रोव्हरला प्रश्न विचारत असल्याचे दाखवण्यात आले आहे. सलमान खान अश्नीर ग्रोव्हरला म्हणतो की, 'मी तुम्हाला माझ्याबद्दल बोलताना ऐकले आहे की, आम्ही त्याला इतक्या पैशात साइन केले, जास्त पैशात साइन केले. तुम्हीही सगळे आकडे चुकीचे सांगितलेत, मग हा दुटप्पीपणा का?'

सलमान खान का चिडला?

यावर सलमान खानला उत्तर देताना अश्नीर म्हणतो की, 'जेव्हा आम्ही तुला आमचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवलं, तेव्हा तो आमचा सर्वात चांगला निर्णय होता. अश्नीरचा बोलण्याचा टोन पाहून सलमान म्हणतो, ‘पण ज्याप्रमाणे तू आता या टोनमध्ये बोलत आहेस, तो टोन तेव्हा नव्हता. मी तुझा व्हिडिओ पाहिला आहे, त्यात हा टोन नव्हता.’ सलमानचे हे रूप पाहून शार्क अश्नीरही आश्चर्यचकित झाला होता.

Bigg Boss 18 : अविनाश रागाच्या भरात वेडा झाला, धक्काबुक्की करून दिग्विजय खाली पडला! पाहा व्हिडिओ

शोमध्ये होणार डबल मस्ती

यंदाचा ‘वीकेंड का वार’ खूप खास असणार आहे. यावेळी सलमान खानच्या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी येणार आहेत. डॉली चायवाला, विक्रांत मेस्सी, रिद्धी डोगरा, राशी खन्ना आणि अश्नीर ग्रोव्हर देखील या शोमध्ये येणार आहेत. म्हणजेच यावेळी प्रेक्षकांना मनोरंजनाचा डोस मिळणार आहे.

या आठवड्यात, ‘बिग बॉस १८’मध्ये ७ स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत, ज्यात करणवीर मेहरा, चुम दरंग, श्रुतिका अर्जुन, रजत दलाल, कशिश कपूर, दिग्विजय सिंह राठी आणि तजिंदर पाल सिंह बग्गा यांचा समावेश आहे. रजत दलाल हा घराचा नवीन टाईम गॉड बनला आहे, म्हणून त्याला सुरक्षित करण्यात आले आहे. घरची सत्ता मिळाल्यानंतर रजत याने दिग्विजय राठी यांनाही सुरक्षित केले आहे. आता फक्त ५ स्पर्धकांना घरातून बाहेर काढायचे बाकी आहे.

Whats_app_banner