Bigg Boss 18 Latest Update : ‘बिग बॉस १८’ या रियॅलिटी टीव्ही शोमध्ये गेल्या काही दिवसांपासून एलिस कौशिक आणि अविनाश मिश्रा चर्चेचा विषय बनले आहेत. अविनाश मिश्रा यांना चाहत पांडे आणि करणवीर मेहरा यांच्यासोबतच्या ट्रीटमेंटमुळे हायलाइट मिळाली, तर एलिस कौशिक देखील तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय बनली आहे. आता हे दोघं पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, पण यावेळी दोघंही एकाच कारणासाठी प्रसिद्धी झोतात आले आहेत. अविनाश आणि एलिसचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात दोघेही एकाच बेडवर झोपलेले दिसत आहेत.
या फोटोत अविनाश एलिसला हातावर डोकं ठेवून झोपवताना दिसत आहे आणि अभिनेत्रीही एकदम कम्फर्टेबल दिसत आहे. या फोटोमुळे दोघांनाही सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले असून, चाहते त्यांच्या मैत्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने एलिसबद्दल बोलताना म्हटले की, तिने जो दावा केला की तो तिच्या बॉयफ्रेंडने लावला आहे. एलिसने म्हटले होते की, ती लवकरच लग्न करणार आहे आणि एका अभिनेत्याने तिला प्रपोज केले. यावर एलिस अश्रू ढाळताना दिसली. यानंतर कंवर ढिल्लन यानेही आपण असे कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे स्पष्ट केले.
‘बिग बॉस १८’च्या घरात अविनाश मिश्रा, एलिस कौशिक, ईशा आणि विवियन डिसेना यांचे नाते खूप घट्ट झाले असून, या चौघांच्या मैत्रीचे खूप कौतुक झाले आहे. पण हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक एलिस आणि अविनाशला ट्रोल करत आहेत. ‘बिग बॉस’शी संबंधित न्यूज शेअरिंग प्लॅटफॉर्म बिग बॉस तकने एक्स हँडलवर हा फोटो पोस्ट करत लिहिले की, ‘कमिटेड मुली असे वागतात का? कदाचित आजकाल मित्र-मैत्रिणींमध्ये अशा प्रकारच्या मिठी मारणे खूप सामान्य झाले आहे.’ एका युजरने पोस्टला रिप्लाय दिला, ‘ते लोक दुसऱ्यांना जज करतात, पण आधी स्वतःकडे बघायचं विसरतात.’
एका एक्स युजरने कमेंट केली की. 'आजकाल 'जस्ट फ्रेंड्स' म्हणजे पूर्णपणे वेगळी गोष्ट होऊ लागली आहे असं वाटतंय. एका प्रेक्षकाने कंवर ढिल्लन यांना टॅग करत विचारले की, ‘तुमची गर्लफ्रेंड टीव्हीवर काय करत आहे ते बघा.’ त्याचप्रमाणे नॅशनल टीव्हीवर एकत्र झोपण्याच्या मुद्द्यावरून अनेकांनी अविनाश आणि एलिसला घेरले आहे, तर काही लोक त्यांच्या समर्थनार्थ उभे आहेत आणि एकत्र झोपणे सामान्य असल्याचे वर्णन केले आहे. येत्या काळात हा मुद्दा घरात अधोरेखित होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.