Bigg Boss 18 Latest Update : 'बिग बॉस १८'च्या आगामी एपिसोडमध्ये खूप धमाके तसेच जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. यावेळी दिग्विजय सिंह राठी आणि अविनाश मिश्रा यांच्यात लढत होणार आहे. प्रोमोनुसार बिग बॉस घरच्यांना एक टास्क देणार आहे. टास्कदरम्यान दिग्विजय आणि अविनाश यांच्यात कोणत्या तरी गोष्टीवरून वाद सुरू होईल आणि हा वाद आणखी चिघळणार आहे.
प्रोमोच्या सुरुवातीला दिग्विजय अविनाशला सांगतो, 'तुझ्या डोळ्यात जी भीती दिसते, ती भीती पाहून मला मजा येते.' यानंतर अविनाश आणि दिग्विजय यांच्यात वाद सुरू होतात. वाद घालताना दोघं एकमेकांच्या जवळ येऊ लागतात. इतकंच नाही तर, ते एकमेकांना धक्काबुक्कीही करू लागतात. अशावेळी ईशा आणि एलिसला मध्येच येऊन दोघांना वेगळं करावं लागतं.
या दरम्यान घरात टास्क सुरू होणार आहे. यावेळी श्रुतिका कशिशचा मार्ग रोखून धरणार आहे. तर, दिग्विजय हा बंद झालेला रस्ता ओलांडण्यासाठी धावत येणार आहे. अविनाश त्यांना रोखण्यासाठी त्यांच्या मागे धावत येणार आहे आणि तेवढ्यात जोरदार धक्का लागून दिग्विजय जमिनीवर पडणार आहे. या दरम्यान नक्की काय झालं हे घरच्यांना समजणारच नाही. मात्र, दिग्विजय घाबरून ओरडायला लागणार आहे. प्रोमो पाहिल्यानंतर अविनाशने जाणूनबुजून दिग्विजयला जमिनीवर पाडले आहे, असे लोकांचे मत आहे.
विवियन डिसेना आणि चाहत पांडेची एक झलक देखील या प्रोमोमध्ये दिसत आहे, ज्यात चाहत विवियनला त्रास देताना दिसत आहे.
‘बिग बॉस १८’चा टाईम गॉड विवियन डिसेनाचा कार्यकाळ आता संपला आहे. अशा स्थितीत टाईम गॉड निवडणुकीसाठी तीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे. टाइम गॉड बनण्याच्या शर्यतीत सहभागी झालेले हे तीन सदस्य विवियनच्या ग्रुपमधील (अविनाश मिश्रा, ईशा सिंह, एलिस कौशिक आणि विवियन डिसेना) नाहीत. अशा परिस्थितीत या तिघांपैकी कोणीही टाइम गॉड झाला तर त्यांच्या गटाच्या अडचणी वाढणार आहेत. माइंड कोच अरफीन खान पहिल्यांदाच टाइम गॉड बनला होता. गेल्या ‘वीकेंड का वार’ला त्याला घरातून बाहेर काढण्यात आले होते. यानंतर विवियन डिसेना दोनदा टाइम गॉड बनला. अरफीनला नुकतेच बाहेर काढण्यात आले असून, या हंगामात विजेतेपद मिळवण्याची क्षमता असलेल्या घरातील खेळाडूंची संख्या सातत्याने वाढत आहे.