Bigg Boss 18: 'बिग बॉस १८'च्या घरातून आणखी एक स्पर्धक एलिमिनेट! 'या' कारणांमुळे पकडला बाहेरचा रस्ता
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 18: 'बिग बॉस १८'च्या घरातून आणखी एक स्पर्धक एलिमिनेट! 'या' कारणांमुळे पकडला बाहेरचा रस्ता

Bigg Boss 18: 'बिग बॉस १८'च्या घरातून आणखी एक स्पर्धक एलिमिनेट! 'या' कारणांमुळे पकडला बाहेरचा रस्ता

Dec 27, 2024 11:38 AM IST

Bigg Boss 18 Latest Elimination : या आठवड्यात 'बिग बॉस १८'मधून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आलेल्या स्पर्धकांमध्ये सारा खान, कशिश कपूर आणि ईशा सिंह यांचाही समावेश होता .

बिग बॉस 18
बिग बॉस 18

Bigg Boss 18 Latest Elimination : 'बिग बॉस १८'मध्ये गेल्या आठवड्यात तिहेरी एलिमिनेशन झाल्यानंतर, आणखी एका सदस्याला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर आता घरात फक्त १० सदस्य उरले आहेत, जे हा खेळ पुढे सुरू ठेवतील. साहजिकच या आठवड्यातील नॉमिनेशन्स खूपच रंजक होती. 'टाइम गॉड' श्रुतिका अर्जुनने करणवीर मेहरा, चुम दरंग आणि शिल्पा शिरोडकर यांना नॉमिनेशनपासून सुरक्षित ठेवले होते, तर विवियन डिसेनासह त्यांचा संपूर्ण चमू नॉमिनेट झाला होता. या आठवड्यात चुम घराची नवीन 'टाइम गॉड; बनली आणि तिने चाहत पांडेला सुरक्षित केले. या आठवड्यात शोमधून कोणत्या सदस्याचा प्रवास संपला ते जाणून घेऊया...

कोणत्या स्पर्धकाचा प्रवास संपला?

या आठवड्यात 'बिग बॉस १८'मधून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आलेल्या स्पर्धकांमध्ये सारा खान, कशिश कपूर आणि ईशा सिंह यांचाही समावेश होता . ईशा सिंह आणि सारा खान या स्पर्धकांपैकी एकीला घरातून बाहेर काढलं जाईल, असे सगळ्यांना वाटत होते. मात्र, या 'वीकेंड का वार' शोमध्ये ज्या स्पर्धकाचा प्रवास संपला आहे, ती सारा अरफीन खान आहे. 'बिग बॉस १८'च्या फॅन पेज 'लाइव्ह फीड अपडेट'नुसार, सारा अरफीन खान या आठवड्यात बाहेर पडली आहे. तिच्या बेघर होण्याला ५ मोठी कारणं आहेत.

Bigg Boss 18: 'बिग बॉस १८'च्या घरात होणार एकता कपूरचा तांडव! स्पर्धकांना वाचवायला सलमानही नसणार

कशामुळे सारा पडली बाहेर?

> सारा अरफीन खान ही रजत दलालची पहिली प्रायोरिटी होती, असे रजतने अनेकदा सांगितले आहे. त्याने साराला अनेक वेळा नॉमिनेट होण्यापासून वाचवले. पण, खेळात तिचे स्वतःचे योगदान फारसे नव्हते.

> सारा अरफीन खान आठवडाभर शांत असायची, पण नॉमिनेशनच्या वेळी घरातील कुणी तिला नॉमिनेट केले, तर ती रागाच्या भरात गोंधळ घालायला लागायची. नॉमिनेशनच्या वेळीच सारा सक्रिय होतं होती, असे म्हणता येईल.

> सारा खानने या घरात व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे. तिने पती अरफीन खानसोबतच्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील दुर्घटनेचा उल्लेख करून चाहत्यांकडून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला.

> सारा खानने घरात अनेक वेळा मर्यादा ओलांडल्या आहेत. कुटुंबातील सदस्यांवर वैयक्तिक हल्ला असो किंवा वस्तू उचलून फेकणे असो. सगळा खेळ काही वेळा चिडचिड करणारा असायचा.

> सारा आरफीन खानला 'बिग बॉस १८'मधून बाहेर काढण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे, सारा पूर्णपणे रजत दलालवर अवलंबून होती. तिचे कुटुंबातील इतर सदस्यांशी असलेले संबंध खूपच कमकुवत होते किंवा अगदी नाममात्र होते. घरातील सदस्यांशी संबंध नसेल तर, शोमध्ये राहणे कठीण आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. याच कारणामुळे साराला १२व्या आठवड्यात बेघर व्हावे लागले.

Whats_app_banner