Bigg Boss 18 : ‘बिग बॉस १८’च्या घरात हंगामा! ‘या’ २ स्पर्धकांना रातोरात काढलं घराबाहेर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 18 : ‘बिग बॉस १८’च्या घरात हंगामा! ‘या’ २ स्पर्धकांना रातोरात काढलं घराबाहेर

Bigg Boss 18 : ‘बिग बॉस १८’च्या घरात हंगामा! ‘या’ २ स्पर्धकांना रातोरात काढलं घराबाहेर

Dec 21, 2024 10:04 AM IST

Bigg Boss 18 Latest Update : नुकतेच दिग्विजय सिंह राठी याला 'बिग बॉस १८' शोमधून बाहेर काढण्यात आले होते. दिग्विजयच्या घराबाहेर पडला तोच पुनः एकदा या घरातून दोन स्पर्धकांना डच्चू देण्यात आला.

सलमान शो बिग बॉस
सलमान शो बिग बॉस (instagram)

Bigg Boss 18 Latest Update : 'बिग बॉस १८'मध्ये सध्या काय घडतंय हे कुणालाच ठाऊक नाही. या घरामध्ये प्रत्येकजण टिकून राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र, हा शो आता शेवटच्या दिशेने चालला असल्याने, एलिमिनेशन देखील पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस १८’च्या घरातून दिग्विजय सिंह राठी याला नुकतेच घराबाहेर काढण्यात आले. दिग्विजयच्या घराबाहेर पडण्याच्या धक्क्यातून चाहते अद्याप बाहेर आलेले नाहीत, की दुहेरी एलिमिनेशन पार पडल्याची बातमी समोर येत आहे. कमी मतांमुळे दोन स्पर्धकांना घराबाहेर काढल्याच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जाणून घेऊया कोण आहे हे स्पर्धक?

ग्लॅमवर्ल्डटॉक्सच्या एक्स ट्विटर पोस्टनुसार, ‘बिग बॉस १८’मधून दिग्विजय सिंह राठीनंतर आता आणखी दोन वाइल्ड कार्ड स्पर्धक बाहेर पडले आहेत. रिपोर्टनुसार, यामिनी मल्होत्रा आणि एडेन रोज यांना घराबाहेर काढण्यात आलं आहे. कमी मतांमुळे दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मात्र, या दोघांच्या एलिमिनेशनबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण त्यांच्या हकालपट्टीच्या बातम्या सोशल मीडियाच्या अनेक पेजवर चर्चेत असतात.

बिग बॉस 18
बिग बॉस 18

Govinda Birthday : इंग्लिश बोलत येत नसल्याने गोविंदाच्या हातून गेली होती हॉटेलची नोकरी! मनोरंजन विश्वात आला अन्...

दिग्विजय सिंह राठी ‘बिग बॉस १८’च्या घरातून बाहेर पडला आहे. दिग्विजय याच्याआधी तेजिंदर पाल सिंह बग्गा, अदिती मिस्त्री, एलिस कौशिक, आरफीन खान, शहजादा धामी, मुस्कान बामणे, व्हायरल भाभी म्हणजेच हेमा शर्मा आणि नायरा बॅनर्जी यांनाही एलिमिनेट करण्यात आले होते. त्याचवेळी गुणरत्न सदावर्ते यांना एका तातडीच्या केसमुळे बाहेर पडावे लागले होते, असे असले तरी ते पुन्हा शोमध्ये पुनरागमन करू शकतात.

सगळेच झाले हैराण!

आगामी ‘वीकेंड का वार’चा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये दिग्विजय राठीच्या एलिमिनेशनमुळे सलमान खानला धक्का बसल्याचे दाखवण्यात आले आहे. घरातून आपला प्रवास इतक्या लवकर संपेल असे वाटले नव्हते, असे तो सलमान खानला म्हणाला. ‘तू इतक्या लवकर बाहेर पडशील, असंही कोणाला वाटलं नव्हतं’, असं सलमान खान त्याला म्हणाला. तेव्हा भाईजानने विचारले, मला एक गोष्ट सांग, तू बॉटममध्ये कसा आलास? यावेळी दिग्विजय राठीही भावूक झाला. तो म्हणाला की मला वाटते की लोक खूप लवकर बदलतात. सलमानने चुम आणि श्रुतिकाला विचारले की, राठी तुमच्या ग्रुपचा आहे आणि त्याला वाचवले पाहिजे असे तुम्हा दोघांना का नाही वाटत? चुमला फक्त करणवीरला पहिल्या क्रमांकावर आणायचे होते. जेव्हा एखाद्याला एलिमिनेट केले जाते तेव्हा तुम्ही रडता आणि दुःखी होता. पण, जेव्हा दिग्विजयला बाहेर काढले जाते तेव्हा, तुम्ही त्याला साथ का दिली नाही?

Whats_app_banner