Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात खरंच भूत आहे? कुणाला दिसलीये लहान मुलगी, तर कुणाला झालेत विचित्र भास!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात खरंच भूत आहे? कुणाला दिसलीये लहान मुलगी, तर कुणाला झालेत विचित्र भास!

Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात खरंच भूत आहे? कुणाला दिसलीये लहान मुलगी, तर कुणाला झालेत विचित्र भास!

Published Oct 06, 2024 10:14 PM IST

Bigg Boss 18: या शोमध्ये प्रेक्षकांनी नेहमीच भांडणं, मारामारी पाहिली आहे. पण बिग बॉसचं घर झपाटलेलं असल्याचंही बोललं जातं. घरात भूत असल्याचा दावा जवळपास प्रत्येक सीझनमध्ये कोणत्या ना कोणत्या स्पर्धकाने केला आहे.

बिग बॉस  सलमान खान
बिग बॉस सलमान खान

Bigg Boss 18:  बिग बॉसचा नवा सीझन १८ आता सुरू झाला आहे. या शोबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढत आहे. जिओ सिनेमा आणि कलर्स टीव्हीवर आज म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजल्यापासून बिग बॉस १८चा प्रीमियर सुरू झाला आहे. या शोमध्ये प्रेक्षकांनी नेहमीच मारामारी, वादावादी आणि भांडणं पाहायला मिळाली आहेत. पण बिग बॉसचे घर झपाटलेलं असल्याचंही बोललं जातं. घरात भूत असल्याचा दावा जवळपास प्रत्येक सीझनमध्ये कोणत्या ना कोणत्या स्पर्धकाने केला आहे. चला तर मग पाहूया आज अशा सेलिब्रिटींची यादी ज्यांना घरात पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटीज जाणवल्या...

अभिनव शुक्ला

अभिनव शुक्ला आणि त्याची पत्नी रुबिना दिलैक बिग बॉस १४मध्ये सहभागी झाले होते. रुबीना या सीझनची विजेतीही होती. अभिनवलाही त्याच्यासोबत घरी पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटी जाणवल्या. त्याने सांगितले होते की, एके रात्री तो वॉशरूममध्ये गेला आणि दरवाजा उघडताच अचानक त्याला थंड गार वारे वाहत असल्याचे जाणवले. ती थंड हवा काही औरच होती. यानंतर कॅमेरा माझ्या मागे लटकत होता आणि दुसरा थरथरत होता.  

पवित्रा पुनियालाही

बिग बॉस १४च्या सीझनचा भाग असलेल्या पवित्रा पुनियालाही घरात भुतासारखं वाटत होतं. ती म्हणाली की, एकदा ती आणि  एजाज वॉशरूममध्ये असताना त्यांना वाटले की, कोणीतरी त्याच्या डोक्यावर टपली मारली. यानंतर दोघेही खूप घाबरले होते.  

Bigg Boss 18: सलमान खानचा भाव वधारला! ‘बिग बॉस १८’साठी घेतलेल्या मानधनाचा आकडा ऐकून येईल चक्कर!

विशाल आदित्य सिंह

विशाल आदित्य सिंह आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड मधुरिमा तुली यांनाही घरात कोणीतरी आहे, असं वाटत होतं. मधुरिमा म्हणाली होती की, जणू तिच्या शरीरातून कोणीतरी सगळी ऊर्जा खेचत आहे, असे वाटतं होते.  

राजीव अदतिया

बिग बॉस १५मध्ये झळकलेल्या राजीव अदतियाने घरात एकदा नव्हे तर दोनदा भूत पाहिले असल्याचा दावा केला होता. याबद्दल बोलताना राजीवने सांगितले होते की, मी निशांत भट, उमर रियाज आणि प्रतीक सहजपाल बसलो होतो, तेव्हा अचानक मी आणि निशांत घाबरून उभे राहिलो. कारण आम्हाला एक लहान मुलगी दिसली. ही चिमुकली इथपर्यंत कशी आली, असा प्रश्न आम्ही एकमेकांना विचारत होतो. मला रोज सावली दिसायची, हे सगळं लाइव्ह फीडमध्येही यायचं. याशिवाय सना मकबूल, हिमांशी खुराना आणि निक्की तांबोळी यांनाही घरातील या विचित्र प्रकारची जाणीव झाली.  

Whats_app_banner