Bigg Boss 18 Celebrity: बिग बॉस मराठीनंतर आता बिग बॉस १८ ची जोरदार चर्चा सुरु आहे. सलमान खानचा रिॲलिटी शो असणारा 'बिग बॉस १८' सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. काही दिवसांपूर्वी या शोचा एक धमाकेदार प्रोमो शेअर करण्यात आला होता. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रोमोमध्ये सांगण्यात आले होते की, यावेळी बिग बॉसची नजर स्पर्धकांच्या भविष्यावर असेल.
अर्थातच यंदाचा सिझन स्पर्धकांच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यावर आधारित असेल. आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. हे सेलिब्रेटी सलमान खानच्या शोमध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान आता आणखी एका नावाच्या चर्चेला उधाण आलं आहे. परंतु हे नाव फारच खास आहे. नुकतंच समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार बिग बॉसच्या निर्मात्यांनी शोसाठी भारतातील पहिल्या एआय इन्फ्लुएंसरशी संपर्क साधला आहे. नैना द एआय सुपरस्टार असे या इन्फ्लुएंसरचे नाव आहे.
बहुतांश लोकांना नैना अवतारबाबत माहिती नाही, तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, नैना अवतार ही भारतातील पहिली एआय इन्फ्ल्यूएंसर आहे. जी मेटा लॅब (AML) ची निर्माती आहे. तिला AI च्या मदतीने तयार करण्यात आले आहेत. नैना ही उत्तर प्रदेशातील झाशी शहरातील प्रसिद्ध फॅशन मॉडेल आहे. तिला अभिनयात प्रचंड रस आहे. आणि आपले हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी नैना मुंबईत आली आहे. नैनाने आतापर्यंत अनेक मोठ्या फॅशन ब्रँडसोबत काम केले आहे. याशिवाय तिने मार्केटिंगमध्येही आपला ठसा उमटवला आहे. सोशल मीडियावरही ती चांगलीच लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिचे ३. ९६ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात.
इंडिया फोरमच्या अहवालानुसार, भारताची पहिली एआय सुपरस्टार नैना 'बिग बॉस १८' चा भाग असू शकते. निर्मात्यांनीं बिग बॉसचा शो अधिक मनोरंजक बनवण्यासाठी नैनाला अप्रोच केलंय की तीसुद्धा एक स्पर्धक असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
'बिग बॉस १८' हा शो येत्या ५ ऑक्टोबरपासून टीव्हीवर प्रसारित होऊ शकतो. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आतापर्यंत अनेक नावे पुढे आली आहेत. यामध्ये शोएब इब्राहिम, समीरा रेड्डी, निया शर्मा, सुनील कुमार, डॉली चायवाला, धीरज धूपर, दलजीत कौर, दीपिका आर्य, सुरभी ज्योती, सोमी अली, कनिका मान, शाहीर शेख मीरा देवस्थळे, मानसी श्रीवास्तव, अंजली आनंद आणि अनिता हसनंदानी यांच्या नावांचा समावेश आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप कोणत्याही स्पर्धकाच्या नावाची अधिकृत पुष्टी केलेली नाही.