बिग बॉसच्या नव्या सीझनची वाट बघणाऱ्या प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कलर्स चॅनेलवर उद्यापासून म्हणजेच ६ ऑक्टोबरपासून सलमान खानचा हा शो प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहे. या शोच्या प्रीमिअरची प्रतीक्षा असतानाच ‘बिग बॉस १८’च्या घरातील पहिला व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी घराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, तुमची डोळे दिपून जातील. यावेळी घरातील सर्वात मोठा बदल तुरुंगात करण्यात आला आहे. अत्यंत वेगळ्या आणि खास शैलीत, आणि खास ठिकाणी कारागृह बांधण्यात आले आहे.
कलर्स टीव्हीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून घराचा पहिला व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘नवीन घरासह नवीन ट्विस्ट, बिग बॉसला माहित आहे की हा सीझन तुम्हाला नक्कीच जागेवर खिळवून ठेवेल.’ कलर्स टीव्हीवर उद्या रात्री ९ वाजता या शोचा प्रीमियर होणार आहे. यावेळी शोची थीम ‘टाईम का तांडव’ असून ‘बिग बॉस १८’चे घर याच थीमप्रमाणे बनवण्यात आले आहे. या घराचे डिझाईन पाहून जुन्या काळातील लेणी आणि गुहा आठवतील. त्याचबरोबर आजच्या काळातील सुविधाही घरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
यावेळी घराची डिझाईन खूप वेगळी आहे. कलर्स चॅनेलने शेअर केलेल्या व्हिडीओची सुरुवात घड्याळाच्या हातांनी होते. प्लेबॅकमध्ये आवाज येतो, घड्याळ आत सेट होत नसल्यामुळे या घरात वेळ कळत नाही. पण प्रत्येक क्षणी तुमचा काळ कसा बदलेल, हे बिग बॉस तुम्हाला समजावून सांगेल. कारण आता वेळ सुरू होणार आहे.
या व्हिडीओमध्ये गार्डन एरिया दाखवण्यात आला आहे. गार्डन एरिया पाहिल्यावर तुम्हाला एखाद्या किल्ल्याची भिंत आठवू शकते. त्याचबरोबर यावेळी स्विमिंग पूलचा परिसरही खूप वेगळा करण्यात आला आहे. तिथेही एका किल्ल्याच्या भिंतींची रचना आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला घरातील किचन, बेडरूम, लिव्हिंग एरिया आणि बाथरूम एरिया दाखवण्यात आला आहे.
यावेळी घरात जी गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे घराचा तुरुंग. जेलचे डिझाइन आपल्याला जुन्या काळाची आठवण करून देईल. प्रत्येक सीझनमध्ये गार्डन एरियात जेल बांधण्यात आले होते. मात्र, यावेळी जेल घरातील स्वयंपाकघराजवळ असणार आहे. यावेळी घरात अनेक बदल करण्यात आले आहेत. प्रीमिअरच्या आदल्या दिवशी घरातील व्हिडीओ पाहून चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या