Bigg Boss 18: प्रतीक्षा संपणार! आज होणार ‘बिग बॉस १८’चा ग्रँड प्रीमियर; कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या…
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 18: प्रतीक्षा संपणार! आज होणार ‘बिग बॉस १८’चा ग्रँड प्रीमियर; कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

Bigg Boss 18: प्रतीक्षा संपणार! आज होणार ‘बिग बॉस १८’चा ग्रँड प्रीमियर; कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

Oct 06, 2024 09:25 AM IST

Bigg Boss 18 Grand Premier : सलमान खानचा शो ‘बिग बॉस १८’ आजपासून म्हणजेच ६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. याचा ग्रँड प्रीमियर आज पार पडणार आहे.

सलमान खान
सलमान खान

Bigg Boss 18 Grand Premier Timings : बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खानचा शो ‘बिग बॉस १८’ सुरु होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून बिग बॉस १८ची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज ती प्रतीक्षा संपणार आहे. बिग बॉसमध्ये प्रत्येक वेळी काहीतरी नवीन असतं. यावेळी नवीन काय असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. या नव्या सीझनच्या प्रतिक्षेदरम्यान चॅनेलकडून सातत्याने नवनवीन प्रोमो रिलीज केले जात आहेत. हे प्रोमो पाहून चाहते अधिकच उत्साहित होत आहेत.  

या शोचा ग्रँड प्रीमिअर तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकाल?

सलमान खानच्या शोचा ग्रँड प्रीमियर आज म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता होणार आहे. कलर्स टीव्ही किंवा जिओ सिनेमाच्या अॅपवर तुम्ही हा शो पाहू शकता. यावेळी या शोची थीम 'टाइम का तांडव' अशी असणार आहे. या शोचे सर्व प्रोमो रिलीज झाल्याने यंदा बिग बॉस अनेक मोठे बदल करणार असल्याचे दिसत आहे.  

या शोचा एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये सलमान खान विविएन डिसेना आणि एलिस कौशिक यांना शोचे टॉप दोन स्पर्धक म्हणताना दिसत आहे. बिग बॉसने स्वतः ही भविष्यवाणी केल्याचे प्रोमोमध्ये म्हटले गेले आहे. आता बिग बॉसच्या या भविष्यवाणीमागे कोणता गेम दडलेला आहे, हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचे आहे.  

Bigg Boss 18 House : ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार पुरातन काळ! कसं दिसतंय नव्या पर्वाचं घर? पाहा पहिली झलक

सेटमध्ये केले बदल

सलमान खानच्या शोचा सेट यावेळी खूप वेगळा करण्यात आला आहे. यावेळी घर पाहून लेण्या आणि गुहांची आठवण होईल. स्वयंपाकघरापासून ते बाथरूम आणि घराच्या लिव्हिंग एरियापर्यंत हे घर एखाद्या गुहेसारखेच दिसत आहे. अगदी लेण्या भासाव्यात अशा पद्धतीने बांधण्यात आले आहे. बिग बॉसने यावेळी सर्वात मोठा बदल केला आहे तो म्हणजे घराच्या आत जेल बनवण्यात आले आहे. प्रत्येक वेळी जेल घराबाहेर असल्यामुळे जेलमध्ये राहणाऱ्या सदस्याला घरात घडणाऱ्या गोष्टींची माहिती नसते.  मात्र, आता घरात बांधलेल्या या जेलमुळे घरात आणखी भांडणे वाढणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

यावेळी घराची डिझाईन खूपच वेगळी आहे. कलर्स चॅनेलने घराची झलक दाखवण्यासाठी शेअर केलेल्या व्हिडीओची सुरुवात घड्याळाच्या हातांनी होते. प्लेबॅकमध्ये आवाज येतो, घड्याळ आत सेट होत नसल्यामुळे या घरात वेळ कळत नाही. पण प्रत्येक क्षणी तुमचा काळ कसा बदलेल, हे बिग बॉस तुम्हाला समजावून सांगेल. कारण आता वेळ सुरू होणार आहे. 

Whats_app_banner