Bigg Boss 18 Finale : बिग बॉस १८ चा विजेता मालामाल होणार! ट्रॉफीसह मिळणार इतकी रक्कम, प्राईज मनी किती? पाहा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 18 Finale : बिग बॉस १८ चा विजेता मालामाल होणार! ट्रॉफीसह मिळणार इतकी रक्कम, प्राईज मनी किती? पाहा

Bigg Boss 18 Finale : बिग बॉस १८ चा विजेता मालामाल होणार! ट्रॉफीसह मिळणार इतकी रक्कम, प्राईज मनी किती? पाहा

Jan 19, 2025 08:02 PM IST

Bigg Boss 18 Finale : 'बिग बॉस १८' चा ग्रँड फिनाले आज म्हणजेच १९ जानेवारी रोजी रात्री ९:३० वाजता कलर्स आणि जिओ सिनेमा ॲपवर प्रसारित होणार आहे. हा शो तीन तास चालेल.

Bigg Boss 18 Finale : बिग बॉस १८ चा विजेता होणार मालामाल! ट्रॉफीसह मिळणार इतकी रक्कम, किती आहे प्राईज मनी?
Bigg Boss 18 Finale : बिग बॉस १८ चा विजेता होणार मालामाल! ट्रॉफीसह मिळणार इतकी रक्कम, किती आहे प्राईज मनी?

Bigg Boss 18 Finale : टीव्ही रिॲलिटी शो 'बिग बॉस १८' चा आज ग्रँड फिनाले आहे. शोच्या अंतिम फेरीत ६ स्पर्धक पोहोचले आहेत. विवियन डिसेना, ईशा सिंह, करणवीर मेहरा, रजत दलाल, चुम दरंग आणि अविनाश मिश्रा हे फिनालेमध्ये दिसणार आहेत.

सोशल मीडियाचा ट्रेंड पाहता, रजत, विवियन आणि करण वीर मेहरा यांच्यापैकी एक या शोचा विजेता ठरणार असल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत शोच्या विजेत्याला ट्रॉफी काय मिळणार? हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

'बिग बॉस १८' चा ग्रँड फिनाले लाईव्ह कुठे पाहणार?

'बिग बॉस १८' चा ग्रँड फिनाले आज म्हणजेच १९ जानेवारी रोजी रात्री ९:३० वाजता कलर्स आणि जिओ सिनेमा ॲपवर प्रसारित होणार आहे. हा शो तीन तास चालेल. शोचा विजेता घोषित होण्यासोबतच अनेक सेलेब्स आपल्या परफॉर्मन्सने शोमध्ये रंगत आणणार आहेत.. शोमध्ये स्पर्धकदेखील त्यांच्या पार्टनरसोबत जबरदस्त डान्स करताना दिसणार आहेत.

'बिग बॉस' विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळणार?

आज रात्री 'बिग बॉस १८' च्या विजेत्याला चमकदार ट्रॉफीसह ५० लाख रुपयांची मोठी रक्कम मिळणार आहे. फिनालेपूर्वी शोच्या ट्रॉफीची एक झलक सोशल मीडियावर पाहायला मिळाली. 

 'सिकंदर'ची स्टारकास्ट येणार

'बिग बॉस १८' बॉलीवूडचा दबंग सलमान खान होस्ट करत आहे. जो लवकरच 'सिकंदर' चित्रपटात दिसणार आहे. अशा परिस्थितीत, रिपोर्ट्सनुसार, 'सिकंदर'ची स्टारकास्ट आणि क्रू देखील शोच्या ग्रँड फिनालेमध्ये सहभागी होऊ शकतात. अशा परिस्थितीत हा एपिसोड आणखी मजेशीर होऊ शकतो. 'सिकंदर' यावर्षी ईदला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Whats_app_banner