Bigg Boss 18: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. सध्या बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सुरु असतानाच दुसरीकडे सलमान खानचाच्या बिग बॉस १८ची चर्चा रंगली आहे. आता अखेर बिग बॉस १८चा पहिला प्रोमो व्हिडिओ सोमवारी रिलीज करण्यात आला आहे. सुपरस्टार सलमान खान हा सीझन होस्ट करणार की नाही याबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती, पण पहिल्या प्रोमो व्हिडिओमुळे चाहत्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे की भाई जान बिग बॉस १८ होस्ट करणार आहे.
कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस १८चा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बॅकग्राऊंडला सलामान खानचा आवाज ऐकू येत आहे. 'बिग बॉसच्या घरात स्पर्धकांचे भवितव्य दिसेल, आता वेळ आली आहे' असे सलमान बोलताना दिसत आहे. बिग बॉस १८ च्या या पहिल्या आणि नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये घड्याळाचे काटे आणि नंबर फिरत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या दरम्यान बिग बॉसची नजर दाखवण्यात आली आहे जी प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत जिथे बिग बॉसचा डोळा थोडा हा थोडा तांत्रिक दाखवण्यात आला होता तिथे यावेळी डोळ्याचा लूक देण्यात आला आहे. जेणेकरुन तो रिअल वाटेल.
सोशल मीडियावर बिग बॉस १८चा हा प्रोमो तुफान व्हायरल झाला आहे. या प्रोमोवरुन अनेकजण वेगवेगळा अंदाज बांधताना दिसत आहेत. एका यूजरेन कमेंट करत 'फैजूला बिग बॉसमध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे' अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने 'या सिझनची खूप उत्सुकता आहे' अशी कमेंट केली आहे.
वाचा: इंटिमेट सीनसाठी दारू पाजली अन् बलात्कार केला; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
अनिल कपूरने बिग बॉस ओटीटी सीझन 3 शूट केल्यापासून लोकं असा अंदाज लावू लागले होते की सलमान खान बिग बॉस सीझन १८ होस्ट करणार नाही. मात्र, आता सलमान खानने प्रोमो शूट करून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शोच्या स्पर्धकांबद्दल बोलायचे झाले तर सोशल मीडियावर काही नावांची चर्चा सुरू आहे. या नावांमध्ये टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीच्या नावाचा समावेश आहे. मात्र निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत यादी समोर आलेली नाही. त्या मुळे आणखी कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.