Bigg Boss 18 : शॉकिंग! ट्रॉफी जिंकेल असं वाटत असतानाच स्पर्धक झाली बेघर! प्रेक्षकांनाही बसला धक्का
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 18 : शॉकिंग! ट्रॉफी जिंकेल असं वाटत असतानाच स्पर्धक झाली बेघर! प्रेक्षकांनाही बसला धक्का

Bigg Boss 18 : शॉकिंग! ट्रॉफी जिंकेल असं वाटत असतानाच स्पर्धक झाली बेघर! प्रेक्षकांनाही बसला धक्का

Jan 15, 2025 11:58 AM IST

Bigg Boss 18 Finale Eviction: 'बिग बॉस १८'च्या शेवटच्या आठवड्यात पहिले धक्कादायक एलिमिनेशन पार पडले आहे. यासोबतच शोला आता 'टॉप ६' स्पर्धकही मिळाले आहेत.

शॉकिंग! ट्रॉफी जिंकेल असं वाटत असतानाच स्पर्धक झाली बेघर! प्रेक्षकांनाही बसला धक्का
शॉकिंग! ट्रॉफी जिंकेल असं वाटत असतानाच स्पर्धक झाली बेघर! प्रेक्षकांनाही बसला धक्का

Bigg Boss 18 Shocking Finale Eviction: 'बिग बॉस १८'च्या शेवटच्या आठवड्यात एक धक्कादायक एलिमिनेशन घडले आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी स्पर्धक शिल्पा शिरोडकर हिल बेघर करण्यात आले आहे. बिग बॉसच्या खेळात सामील झालेल्या स्पर्धकांपैकी केवळ ७ स्पर्धकांनी शेवटच्या आठवड्यात आपली जागा बनवली होती. मात्र, बिग बॉसने आधीच स्पष्ट केले होते की, गेल्या आठवड्याप्रमाणेच फिनालेच्या आठवड्यातही दुहेरी एलिमिनेशन होईल. मंगळवारी, सायंकाळी ५ वाजेपर्यंत वोटिंग लाईन्स सुरू होत्या. त्यानंतर हा धक्कादायक निर्णय घेण्यात आला.

शेवटच्या आठवड्यातील पहिले एलिमिनेशन धक्कादायक

बिग बॉसच्या फॅन पेजच्या माहितीनुसार, फिनाले आठवड्यात पहिले एलिमिनेशन झाले आहे. या आठवड्यात शिल्पा शिरोडकरला घराबाहेर काढण्यात आले आहे. ही बातमी कळताच चाहत्यांनाही धक्का बसला आहे. काही लोकांनी हा निर्णय योग्य ठरवला आहे. असे मानले जात होते की, टॉप ७ मधून ईशा सिंहची बाहेर पडू शकते. परंतु, मतदानाच्या ट्रेंडमध्ये, शिल्पाला सर्वात कमी मते मिळाली आहेत.

शिल्पाचे एलिमिनेशन कसे झाले?

'बिग बॉस तक' या फॅन पेजनुसार, बिग बॉस घराचा डिझायनर उमंग कुमार फिनाले आठवड्यात प्रवेश करणार आहे, ज्याचा प्रोमो देखील समोर आला आहे. उमंग मिडवीक एविक्शनमध्ये स्पर्धकांना बाहेर काढण्याच्या कामासाठी घरात दाखल झाला होता. टास्क दरम्यान, त्याने सर्व स्पर्धकांना घरातील त्यांच्या आवडत्या ठिकाणी नेले, जेथे त्यांनी सर्वाधिक वेळ घालवला होता. यादरम्यान ओमंग कुमारने सर्व स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेले पत्र दिले.

Bigg Boss 18 : शेवटचा आठवडा अन् सगळेच स्पर्धक झाले नॉमिनेट ! कधीपर्यंत मत देता येणार? जाणून घ्या...

पत्राद्वारे केले बेदखल!

'बिग बॉस १८'च्या आगामी एपिसोडमध्ये तुम्हाला उमंग कुमार शिल्पा शिरोडकरला तिच्या पतीचे पत्र देताना पाहायला मिळेल. हे पत्र वाचून शिल्पा भावूक होते. यानंतर बिग बॉसकडून शिल्पाला दुसरे पत्र देण्यात आले आहे. हे पत्र तिला एलिमिनेट करण्याबद्दल सांगणारं आहे. यासोबतच 'बिग बॉस १८'च्या घरातून शिल्पा शिरोडकरचा प्रवास संपला आहे.

शिल्पा शिरोडकरला घरातून बाहेर काढल्यानंतर शोला टॉप ६ स्पर्धक मिळाले आहेत. यामध्ये करणवीर मेहरा, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा, रजत दलाल, चुम दरंग आणि ईशा सिंह यांचा समावेश आहे. मात्र, या आठवड्यात आणखी एक धक्कादायक एलिमिनेशन पार पडणार आहे, ज्यानंतर शोला त्यांचे टॉप ५ अंतिम स्पर्धक मिळतील.

Whats_app_banner