Bigg Boss 18 Vivian Dsena : टीव्हीचा सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस १८’ आता शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. हा शो फिनालेच्या दिशेने वाटचाल करत असताना प्रेक्षक त्याचा अधिकच आनंद लुटत आहेत. या आठवड्यात ‘बिग बॉस १८’च्या घरात खूप भावनिक क्षण पाहायला मिळाले आहेत. बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक सुरू झाला आहे. स्पर्धकांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंबीय घरात दाखल झाले आहेत. आता अभिनेता विवियन डिसेना याची पत्नी नुरान अली आणि मुलगी बिग बॉसच्या घरातच पोहोचले आहेत. इतक्या दिवसानंतर पत्नी आणि मुलीला भेटून विवियन डिसेना देखील खूप भावूक झाला होता. अशातच आता विवियन आणि नूरनचा मध्यरात्रीचा बेडवरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर युजर्सच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
अभिनेत्री विवियन डिसेनाची पत्नी नूरन अली हिची ‘बिग बॉस फॅमिली वीक’मध्ये एन्ट्री झाली आहे. विवियनच्या पत्नीची या घरात एन्ट्री झाल्यापासून अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. अशातच आता विवियन आणि नूरनचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेत आला आहे. त्यांच्या एकत्र रात्रीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोघेही घरातील बेडवर दिसत आहेत. रात्रीच्या अंधारात दोघं एकमेकांच्या कुशीत विसावलेले दिसले. हे दोघे बऱ्याच काळानंतर एकमेकांना भेटले आहेत. अशातच हा खास क्षण पाहिल्यानंतर चाहतेही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
विवियन डिसेना आणि नूरन अली यांच्या या व्हिडिओवर युजर्सकडून भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे अनेक युजर्सना या दोघांचे नाते खूप आवडत असताना, अनेकजण त्यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली की, ‘अरे त्याची बायको एकटीच आहे.’ आणखी एका युजरने लिहिलं आहे की, ‘बायको आहे त्याची.. यात काय वावगं दिसत आहे.. ते एकमेकांना मिठी मारत आहेत.’ एकाने लिहिले की, ‘विवियन, भाई १८ दिवसांनी घरीच जायचे आहे, थोडा धीर धर’. एक जण म्हणाला, ‘दोघेही चुम-वीर होण्याच्या वाटेवर आहेत.’ या व्हिडिओवर अशा अनेक कमेंट्स येत आहेत.
‘बिग बॉस १८’ हा शो आता काहीच दिवसांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या शोमध्ये विजेता कोण ठरणार याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
संबंधित बातम्या