Bigg Boss 18 Fame Hema Sharma: 'बिग बॉस 18' च्या घरामधून बाहेर पडलेली पहिली स्पर्धक हेमा शर्मा होती. सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर आणि अभिनेत्री असलेल्या हेमाला मतांच्या कमतरतेमुळे शोमधून बाहेर पडावे लागले होते. मात्र, ती शोमुळे नेहमीच चर्चेत असते. पती आणि मुलांबाबतही ती अनेकदा ट्रोल झाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, 'बिग बॉस 18' मधून बाहेर आल्यापासून तिच्या आयुष्यात कोणताही बदल झालेला नाही. घर चालवण्यासाठीही तिला कष्ट करावे लागत आहेत.
हेमा शर्माने फ्री प्रेस जर्नलशी संवाद साधताना खुलासा केला की 'बिग बॉस 18' नंतर तिच्या आयुष्यात फारसा बदल झालेला नाही. ती अजूनही उदरनिर्वाहासाठी धडपडत आहे. तिने पती गौरववर तिची लोकप्रियता कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. रिॲलिटी शोमध्ये आल्यानंतर लाखोंची कमाई होईल, अशी अपेक्षा असल्याचेही तिने सांगितले. हेमाने सांगितले की, तिच्या पतीने तिला पोटगी देणे बंद केले आहे.
हेमा शर्मा म्हणाली, “माझ्या पतीने प्रसिद्ध होण्यासाठी माझा पुरेपूर फायदा घेतला. माझ्यासोबत तोही प्रसिद्ध झाला. मी शोमधून लाखो रुपये आणले आहेत असे त्याला वाटते. आणि गेल्या सात महिन्यांपासून तो मला 35 हजार रुपये देत होता. आता त्याने तेही द्यायला नकार दिला आणि म्हणाला आता मॅडमकडून मागून घ्या'.
हेमा शर्मा म्हणाली, “माझ्याकडे फक्त 30-40 हजार रुपये शिल्लक होते आणि मला भाडेही द्यावे लागले. त्यामुळे मी गुरुवारी 8 नोव्हेंबर रोजी माझ्या कानातले झुमके 1 लाख 37 हजार रुपयांना विकले. आता मला भाडे, वीज बिल आणि इतर गोष्टीही भराव्या लागणार आहेत. मी पहिल्यांदा हे बोलत आहे कारण मी घरात आल्यावर माझी काय अवस्था झाली होती हे माझ्या घरच्यांना माहीत नाही'.
हेमा शर्माने सांगितले की, जेव्हा ती 'बिग बॉस 18' मध्ये जाणार होती तेव्हा तिच्याकडे फक्त 50,000 रुपये होते. तिने सांगितले की, तिला तिच्या मुलांची काळजी वाटत होती. शोमध्ये घालण्यासाठी तिच्याकडे कपडे नव्हते. तिने आधीच घेतलेले कपडे सुटकेसमध्ये ठेवलेले आणि तसंच शोसाठी निघून गेली. हेमा म्हणाली की, जेव्हा तिने पाहिले की सेलिब्रिटी आपल्या पोशाखांची पुनरावृत्ती करत नाहीत तेव्हा त्याचा तिच्यावर मानसिक परिणाम झाला'.