Bigg Boss 18: पहिल्याच दिवशी रेशनवरून वरून झाले वाद; रजत दलालने तजिंदर बग्गाला दिली थेट धमकी!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 18: पहिल्याच दिवशी रेशनवरून वरून झाले वाद; रजत दलालने तजिंदर बग्गाला दिली थेट धमकी!

Bigg Boss 18: पहिल्याच दिवशी रेशनवरून वरून झाले वाद; रजत दलालने तजिंदर बग्गाला दिली थेट धमकी!

Published Oct 07, 2024 01:50 PM IST

Bigg Boss 18 Day 1 : ‘बिग बॉस १८’च्या घरात पहिल्याच दिवशी मोठा हंगामा पाहायला मिळाला आहे. रजत दलाल आणि तजिंदर बग्गा यांच्यात रेशन आणि जुन्या गोष्टींवरून वाद झाला आहे.

बिग बॉस 18 में पहला बड़ा झगड़ा
बिग बॉस 18 में पहला बड़ा झगड़ा

Bigg Boss 18 Day 1 Big Fight : ‘बिग बॉस सीझन १८’चा प्रवास सुरु झाला असून, सर्व स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. सीझनचा प्रीमिअर एपिसोड धमाकेदार होता. तसेच, स्पर्धकांना भरपूर मनोरंजन करण्याची संधी मिळाली. स्पर्धकांनी घरात पाऊल ठेवल्यानंतर आता पहिल्या दिवसाचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात रजत दलाल आणि तजिंदर बग्गा एकमेकांना भिडताना दिसले आहेत. रजत दलाल शोमध्ये प्रवेश करताच या शोचे हे पहिले भांडण सुरू झाले आहे. 

रेशनच्या मुद्द्यावर चढला रजत दलालचा पारा!

बिग बॉसच्या घरात पहिल्या भांडणाचे कारण ठरला रजतचा भूतकाळ. खरं तर रजत दलाल तजिंदर बग्गा आणि त्याच्या रणनीतीवर विशेष प्रभावित झालेला नाही. बिग बॉसने हेमा आणि तजिंदर बग्गा सोबत रेशनचे सामान तुरुंगात ठेवले आहे. त्यांना घरच्यांना रेशन द्यावं लागतं आहे. आता हेमा आणि बग्गा अगदी सहज लोकांना रेशन देत असल्याने रजत दलाल म्हणाला की, ‘मग तुम्ही तुरुंगात असण्याचा अर्थ काय?’ बिग बॉसच्या घरात रजत खूप अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. इतकंच नाही तर, आता तजिंदरसोबत त्याचं भांडणही झालं, ज्यात त्याने त्याला थेट मारण्याची धमकी दिली.

नव्या प्रोमो व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तजिंदर बग्गा तुरुंगात बसून रजतच्या भूतकाळाबद्दल बोलत होता, तेव्हा रजतला त्याच्या काही गोष्टी पटल्या नाहीत. रजत दलालने विचारले की, तू बाईक पडताना पाहिली का? तेजिंदरने होकारार्थी उत्तर दिले. तेव्हा तो म्हणाला की, मग तू खोटं का बोलत आहेस. रजत दलालने तजिंदरला धमकावत म्हटले की, ‘हे गेट मधे आहे नाही तर, भाऊ मी दोन मिनिटात तुझी खिल्ली उडवली असती.’ रजतने तजिंदर बग्गाला धमकावले.

‘बिग बॉस १८’ची ही पहिली लढाई वाढणार का?

फिटनेस ट्रेनर आणि कंटेंट क्रिएटर रजत दलाल याच्या धमक्यांसमोर तजिंदर बग्गा बॅकफूटवर जाताना दिसला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे हेच त्याच्या शोमध्ये येण्यामागचे कारण असल्याचे तजिंदर बग्गाने प्रीमिअर एपिसोडमध्ये स्पष्टपणे सांगितले होते. तर, रजत दलाल अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. रजतच्या रागाची खूप चर्चा आहे. सध्या ‘बिग बॉस १८’मध्ये हे पहिलं भांडण किती वाढणार आहे, हे पाहणं चाहत्यांसाठी खूप औत्सुक्याचं ठरणार आहे.

Whats_app_banner