बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला रिअॅलिटी शो 'बिग बॉस १८' रविवारपासून (६ ऑक्टोबर) सुरू होत आहे. या शोमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अशातच निर्मात्यांनी गुरुवारी दोन नवे प्रोमो शेअर केले आहेत. या दोन प्रोमोच्या माध्यमातून शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. एका प्रोमोवरुन मराठमोळी अभिनेत्री देखील यंदा बिग बॉस १८मध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.
कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस १८चा प्रोमो शेअर केला आहे. वाहिनीने एकसाथ दोन प्रोमो शेअर केले आहेत. पहिल्या प्रोमोमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची बहीण आणि अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचे नाव कन्फर्म झाले होते. दुसऱ्या प्रोमोमध्ये 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही मालिकेत काम करणार अभिनेता दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रोमोच्या सुरुवातीलाच 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील अभिनेता म्हणतो की, 'मी पंजाबचा आहे. मी चार शो केले आहेत. मला माहित नाही की एके दिवशी असे काय झाले, जेव्हा माझ्या निर्मात्याने संपूर्ण युनिटसमोर माझा अपमान केला. ते माझा अपमान करत होते आणि मला तिथून हाकलून देत होते. माझं नशीब हिरावून घेण्याचा कुणालाही अधिकार नाही.' यानंतर अभिनेत्याची एक धूसर झलक दाखविण्यात आली, जी पाहून चाहत्यांना समजले की तो 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही मालिकेचा शहजादा धामी आहे.
अभिनेता शहजादा धामीला रातोरात शोमधून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे प्रोमो पाहून शहजादा शोमध्ये दिसणार असल्याचे कन्फर्म झाले. शहजादानंतर मालिकेतून प्रतीक्षा होनमुखेलाही काढून टाकण्यात आलं होतं. आता शहजादा बिग बॉसमध्ये दिसणार असल्यामुळे सर्वजण आनंदी झाले आहेत.
वाचा: 'बिग बॉस १८'च्या घरात दिसणार दयाबेन? निर्मात्यांनी मानधन म्हणून दिले कोट्यवधी रुपये
कलर्स वाहिनीने शेअर केलेल्या दुसऱ्या प्रोमोमध्ये एक अभिनेत्री दिसत आहे. या अभिनेत्रीचा चेहरा दिसत नसला तरी टॅट्यू पाहून अनेकांनी ती शिल्पा शिरोडकर असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रोमोवर अनीता हसनंदानीने कमेंट करत तिचे नाव घेतले आहे. त्यामुळे शिल्पा बिग बॉस १८मध्ये दिसणार असल्याचे कन्फर्म झाले आहे.
संबंधित बातम्या