Bigg Boss 18: 'बिग बॉस १८'मधील स्पर्धक रजत दलालने दिली होती कॅरी मिनातीला धमकी, वाचा काय होते प्रकरण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 18: 'बिग बॉस १८'मधील स्पर्धक रजत दलालने दिली होती कॅरी मिनातीला धमकी, वाचा काय होते प्रकरण

Bigg Boss 18: 'बिग बॉस १८'मधील स्पर्धक रजत दलालने दिली होती कॅरी मिनातीला धमकी, वाचा काय होते प्रकरण

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 07, 2024 05:26 PM IST

Bigg Boss 18: नुकताच 'बिग बॉस १८' शो सुरु झाला आहे. या शोमध्ये रजत दलाल हा स्पर्धक सहभागी झाला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का रजतने एकदा कॅरी मिनातीला थेट धमकी दिली होती. काय होते प्रकरण? चला जाणून घेऊया...

Bigg Boss 18
Bigg Boss 18

नुकताच छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो 'बिग बॉस १८' सुरु झाला आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. यंदा बिग बॉस १८ची टाइम का तांडव ही अनोखी थिम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाचा सिझन थोडा वेगळा असून चर्चेत असणार असे दिसत आहे. तसेच या शोमध्ये फिटनेस इन्फ्लुएन्सर रजत दलाल देखील सहभागी झाला आहे. हा रजत दलला नेमका कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

रजत दलाल हा एक फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे. सोशल मीडियावर तो प्रसिद्ध आहे. पण त्याच्या कामाऐवजी लोक त्याला यूट्यूबर कॅरी मिनातीसोबत झालेल्या वादामुळे विशेष ओळखतात. रजतने थेट कॅरीला धमकी दिली होती. हा वाद आजही कोणी विसरलेले नाही. रजत बिग बॉसच्या घरात गेल्यामुळे पुन्हा एकदा हा वाद समोर आला आहे.

काय होता वाद?

रजत दलाल आणि कॅरी मिनाती यांच्यामध्ये वाद तेव्हा सुरु झाला जेव्हा यूट्यूबरने फिटनेस इन्फ्लुएन्सरच्या सिग्मा मेलवर कमेंट करत थट्टा केली. कॅरी मिनातीने रजतला रोस्ट करत म्हटले की याचे फक्त शरीर वाढले आहे. पण विचार आणि आवाज अजूनही बालिश आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर रजत दलालने कॅरी मिनातीला व्हिडिओ डिलिट करण्याची धमकी दिली. यानंतर, कॅरी मिनातीने इन्स्टाग्रामवर माफी मागितली. त्याचा उद्देश केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नसल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याने रजतची खिल्ली उडवलेला भाग काढून टाकला होता.
वाचा: बॉलिवूडमध्ये १९८०साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमामुळे झाले होते रेल्वेचे नुकसान, चित्रपटही ठरला फ्लॉप

रजत हा बिग बॉसमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये रजत भाजप नेते तजीद्दर पाल सिंग बग्गा यांच्याशी वाद घालताना दिसत आहे. हा वाद एका व्हिडीओवरुन झाला आहे. एका बाईकस्वार इतर गाड्यांना जाऊन ठोकतो. या व्हिडीओविषयी बोलताना बग्ग म्हणतात की मी अशा अनेक बाईकस्वारांना पडताना पाहिले आहे. त्यावर रजत चिडतो आणि म्हणतो, 'मी असाच अनपड गवार नाही.मी तुमच्याशी खूप प्रेमाने बोलतो. इथे सर्वजण पाहत आहेत. त्यामुळे प्रेमाने बोला. दोन मिनिटात मी तुम्हाला धडा शिकवू शकतो.'

Whats_app_banner