Bigg Boss 18 Contestant: ‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोचा १८वा सीझन पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी, या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांपैकी एक नाव म्हणजे विवियन डिसेना, ज्याने टेलिव्हिजनच्या जगात आपली खास ओळख निर्माण केली आहे. 'शक्ती' या मालिकेत सगळ्यांनी त्याला व्हॅम्पायर किंवा हरमनजीच्या भूमिकेत पाहिले आहे. परंतु, तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिला आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक रहस्ये दडलेली आहेत.
विवियन डिसेनाचा जन्म २८ जून १९८८ रोजी उज्जैनमध्ये झाला होता आणि तो पहिल्यांदा 'प्यार की ये एक कहानी' या मालिकेत दिसला होता. या शोने त्यांना केवळ ओळखच दिली नाही, तर त्यांची पहिली पत्नी वहबिझ दोराबजी हिच्याशीही त्याची ओळखही करून दिली. या मालिके दरम्यान ते प्रेमात पडले आणि २०१३मध्ये दोघांनी लग्न केले. परंतु, लग्नाच्या चार वर्षानंतर त्यांच्यात मतभेद सुरू झाले, ज्यामुळे शेवटी २०२१मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.
घटस्फोटानंतर विवियनच्या आयुष्यात नवे वळण आले. २०२२ मध्ये अभिनेत्याने इजिप्शियन पत्रकार नूरन अलीशी गुपचूप लग्न केले. मात्र, विवियनने आतापर्यंत आपल्या पत्नी आणि मुलीचा चेहरा मीडियापासून लपवून ठेवला आहे. त्यामुळे त्याचे चाहते आणखीनच आतुर झाले आहेत. एका मुलाखतीत विवियनने सांगितले की, तो बाबा झाला आहे. परंतु, त्याने आपले कौटुंबिक आयुष्याला नेहमीच खाजगी ठेवणे चांगले मानले आहे.
विवियन डिसेनाबद्दल सर्वांनाच धक्का बसलेली गोष्ट म्हणजे अभिनेत्याने दुसऱ्या लग्नापूर्वी आपला धर्म बदलून, इस्लाम धर्म स्वीकारला होता. आता तो इस्लामचे पालन करतो आणि ५ वेळा नमाज अदा करतो. विवियनने याबद्दल बोलताना सांगितले की, त्याने रमजान २०१९पासून इस्लामचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला होता, जी त्याच्यासाठी आयुष्याची एक नवीन सुरुवात ठरली होती.
आता विवियन डिसेना 'बिग बॉस १८' मध्ये प्रवेश करत असल्याने त्याचे चाहते त्याच्या प्रवासाबद्दल खूप उत्सुक झाले आहेत. शोमध्ये एंट्री करण्यापूर्वीच त्याच्या भूतकाळातील किस्सेही चर्चेचा विषय बनले आहेत. यावेळी शोमध्ये विवियनची खरी व्यक्तिरेखाही पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या