Video : विवियन डिसेनाने रजत दलालला उचलून आपटलं; ‘बिग बॉस १८’च्या घरात जोरदार हाणामारी! व्हिडीओ व्हायरल
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Video : विवियन डिसेनाने रजत दलालला उचलून आपटलं; ‘बिग बॉस १८’च्या घरात जोरदार हाणामारी! व्हिडीओ व्हायरल

Video : विवियन डिसेनाने रजत दलालला उचलून आपटलं; ‘बिग बॉस १८’च्या घरात जोरदार हाणामारी! व्हिडीओ व्हायरल

Nov 05, 2024 08:40 PM IST

Bigg Boss 18 Viral Video : 'बिग बॉस १८'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये विवियन डिसेना आणि रजत दलाल हाणामारी करताना दिसले आहेत.

Bigg Boss 18 Viral Video
Bigg Boss 18 Viral Video

Bigg Boss 18 Viral Video : 'बिग बॉस १८'च्या आगामी भागांमध्ये विवियन डिसेना आणि रजत दलाल यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनुसार, बिग बॉस घरातील सदस्यांना दोन गटात विभागणार आहेत. पहिल्या गटात विवियन, शिल्पा शिरोडकर, अविनाश मिश्रा, एलिस कौशिक, चुम दारंग आणि ईशा सिंह यांचा समावेश आहे. तर, दुसऱ्या गटात करण वीर मेहरा, रजत, श्रुतिका अर्जुन, चाहत पांडे, कशिश कपूर आणि दिग्विजय सिंह राठी यांचा समावेश आहे.

‘बिग बॉस १८’च्या घराला दोन गटांमध्ये विभागल्यानंतर बिग बॉस म्हणतात की, ‘या घरातील दोन्ही टीमला आपला नवा टाइम गॉड निवडण्याची संधी मिळणार आहे.’ यानंतर घरातील कामाला सुरुवात होते. या दरम्यान टास्क देखील सुरू होतो. टास्क सुरू होताच रजत म्हणतो की, 'तोड तो मैं दुंगा.. बननेही नही दुंगा.' तेवढ्यात दोन्ही टीम्स एकमेकांचे काम बिघडवू लागतात. रजत विवियनच्या टीमचा टास्क बिघडवायला येतो, तेव्हा विवियन त्याला पकडतो. रजत एका बाजूने आणि विवियन दुसऱ्या बाजूने आपला पूर्ण जोर लावतात. मात्र, जेव्हा विवियन आपली सर्व शक्ती पणाला लावतो, तेव्हा रजत ढकलला गेल्यामुळे खाली पडतो.

पाहा प्रोमो :

व्हायरल होतोय व्हिडीओ

विवियन आणि रजतच्या भांडणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर एका युजरने कमेंट केली की, 'विवियनने आपलं म्हणणं सिद्ध केलं, मी बोलत नाही, खेळतो.' तर एकाने लिहिले की, ‘विवियनची टीम जिंकेल.’ तिसऱ्याने लिहिलं की, ‘ओह माय गॉड! विवियनने रजतला उचलून आपटलं.’

रजतच्या चुकीमुळे ईशाही जखमी

गेल्या एपिसोडमध्येही रजतने विवियन, अविनाश, ईशा आणि एलिस यांना टार्गेट केले होते. जणू अख्खं घर मिळून या चौघांना त्रास देतंय, असं वाटत होतं. मात्र, आज जे घडणार आहे ते पाहून प्रेक्षकांनाही आश्चर्य वाटणार आहे. विवियन आणि रजत यांच्यात सुरू झालेला हा संघर्ष आता हिंसेचे रूप घेणार आहे.आज रजत दलाल ईशाला स्पर्श करून विवियन डिसेना भडकवण्याचा प्रयत्न करेल. 

मात्र, विवियन आपल्या बुद्धीचा वापर करून त्यांना उत्तर देईल. मात्र, यानंतर अविनाश मिश्रासोबत रजतचे वाद  होणार आहेत. यामुळे आधी घरात गोंधळ होईल आणि मग रजत हाणामारी करेल. रजत आज बिग बॉसच्या घरात ताकद दाखवताना दिसणार आहे आणि घरातील बाकीचे सदस्य त्याला रोखण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, रजतच्या चुकीमुळे ईशा सिंह गंभीर जखमी होणार आहे.आता ईशाची दुखापत आणि अविनाशसोबतची त्याची हिंसक वागणूक यामुळे रजत कोणत्या अडचणीत सापडणार का, हे लवकरच कळणार आहे.

Whats_app_banner