बॉलिवूडचा भाईजान सलमान खान होस्ट करत असलेला रिअॅलिटी शो बिग बॉस १८ आता रवी किशनने प्रेक्षकांसाठी खास बनवला आहे. या रिअॅलिटी शोमध्ये रवी किशनची होस्टिंग सलमान खानपेक्षा खूप वेगळी असून प्रेक्षकही त्याला भरभरून प्रेम देत आहेत. एका मुलाखतीत रवी किशनला जेव्हा विचारण्यात आलं की, बिग बॉसच्या घरात तुम्हाला कोणते बॉलिवूड स्टार्स पाहायला आवडतील? तेव्हा रवी किशनने सुचवलेल्या नावांची सध्या चर्चा सुरु आहे. आता रवी किशनने कोणती नावे घेतली चला जाणून घेऊया...
'पिंकविला'शी बोलताना रवी किशन म्हणाला की, बिग बॉसच्या घरात कंगना रणौत, रणबीर कपूर, अजय देवगण, रणवीर सिंग आणि नाना पाटेकर यांना पाहण्याची इच्छा आहे. 2006 साली रवी किशन स्वत: बिग बॉसच्या घरात होता. टीव्हीच्या या सर्वात मोठ्या रिअॅलिटी शोचा पहिला सीझनही रवी किशनमुळे चर्चेत आला होता. भोजपुरी चित्रपटाचा सुपरस्टार अभिनेता रवी किशन या सीझनमध्ये विजय मिळवू शकला नसला तरी तो खूप चर्चेत आला होता.
रवी किशनला जेव्हा विचारण्यात आले की, तुम्ही विवियन डिसेनाबद्दल पक्षपाती आहात का? तेव्हा अभिनेता म्हणाला, "बिग बॉस पक्षपाती असू शकत नाही. जर बिग बॉस भेदभाव करू लागला तर शो कंटाळवाणा होईल. टीव्ही अभिनेता विवियन डिसेना या सीझनमध्ये खूप लोकप्रिय नाव आहे. अनेक चाहते विवियन डिसेनाला या सीझनचा फिक्स विनर म्हणत आहेत. मात्र, यंदाच्या सीझनची ट्रॉफी आणि बक्षिसाची रक्कम कोण घरी घेऊन जाणार या प्रश्नाचे उत्तर बिग बॉस १८ च्या ग्रँड फिनालेमध्येच मिळणार आहे."
वाचा: कोणी पत्नीचे दागिने गहाण ठेवले तर कोणी राहते घर; कर्जात बुडाले होते 'हे' मराठी कलाकार, पण...
कोणत्या बॉलिवूड कलाकारांची नावे घेतली?
बिग बॉससाठी रवी किशनने सुचवलेल्या नावांबद्दल बोलायचे झाले तर त्याने ज्या कलाकारांची नावे सांगितली, ते सर्व कलाकार अजूनही करिअरच्या यशाच्या शिखरावर आहेत. रणबीर कपूरकडे लव्ह अँड वॉर, रामायण आणि अॅनिमल पार्क सारखे प्रोजेक्ट्स आहेत, तर कंगना रणौत तिच्या इमर्जन्सी सिनेमामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे हिट मशीन म्हणून ओळखला जाणारा रणवीर सिंग देखील डॉन-3, राक्षस-आणि ब्रह्मास्त्र-2 मुळे चर्चेत आहे. अजय देवगणच्या हातात देखील काही नवे प्रोजेक्ट्स आहेत.