छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून 'बिग बॉस' पाहिला जातो. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसचे १७वे पर्व हे चर्चेत आहे. यंदा कोणता स्पर्धक जिंकणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच या शोचा विजेता घोषित केला जाणार आहे. पण विजेत्या स्पर्धकाला काय बक्षिस मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'बिग बॉस १७' या कार्यक्रमाची कोण विजेता होणार? याबद्दल अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत. या कार्यक्रमासंदर्भात नवनवे अपडेट समोर येत आहेत. नुकताच पार पडलेला 'वीकेंडचा वार' करण जोहरने होस्ट केला होता. दरम्यान करणने स्पर्धकांची शाळा घेतली.
वाचा: यापेक्षा छोटा भीम कार्टून बरे; ‘शिवा’ मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
'बिग बॉस १७'च्या विजेत्याला एक ट्रॉफी, आलिशान कार आणि ५० लाख रुपयांचे रोख बक्षिस मिळणार आहे. या बक्षिसाने एखाद्या स्पर्धकाचे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. त्यामुळे कोणता स्पर्धक ट्रॉफीवर त्याचे नाव कोरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'बिग बॉस'चे एक फॅन पेज आहे. या पेजने 'बिग बॉस १७'मधील विजेत्याचे नाव सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पेजने दिलेल्या माहितीनुसार, अंकिता लोखंडे (Ankita Lokhande), विकी जैन (Vicky Jain) मनारा चोप्रा (Mannara Chopra) 'बिग बॉस 17'चे विजेते होणार नसून मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) या कार्यक्रमाचा विजेता होईल. 'बिग बॉस १७'च्या विजेत्यासंदर्भात अनेक ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात मिळालेल्या माहितीनुसार २८ जानेवारी २०२४ रोजी मुनव्वर फारुकी 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर नाव कोरणार आहे.