छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून 'बिग बॉस' पाहिला जातो. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसचे १७वे पर्व हे चर्चेत आहे. यंदा कोणता स्पर्धक जिंकणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सोशल मीडियावर एका नावाची चर्चा सुरु आहे. हा स्पर्धक कोणता चला जाणून घेऊया...
बिग बॉसचे एक फॅन पेज आहे. या पेजने 'बिग बॉस १७'मधील विजेत्याचे नाव सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पेजने दिलेल्या माहितीनुसार, अंकिता लोखंडे (Ankita Lokhande), विकी जैन (Vicky Jain) मनारा चोप्रा (Mannara Chopra) 'बिग बॉस 17'चे विजेते होणार नसून मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) या कार्यक्रमाचा विजेता होईल. 'बिग बॉस १७'च्या विजेत्यासंदर्भात अनेक ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात मिळालेल्या माहितीनुसार २८ जानेवारी २०२४ रोजी मुनव्वर फारुकी 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर नाव कोरणार आहे.
वाचा: १९३० साली मर्सिडीज बेंझची अॅम्बेसेडर होती 'ही' मराठी अभिनेत्री
बिग बॉस १७चा ग्रँड फिनाले २८ जानेवारी २०२४ रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमात सध्या फॅमिली वीक सुरु आहे. शोमध्ये अंकितीची आई आणि विकी जैनची आई देखील आल्याचे पाहायला मिळाले. त्या पाठोपाठ आता मुनव्वरची बहिण येणार असल्याचे कळत आहे. तसेच अरुन माशेट्टीची पत्नी शोमध्ये येणार आहे. हा विक संपल्यानंतर बिग बॉसच्या घरात ग्रँड फिनालेची तयार केली जाणार आहे. आता मुनव्वर फारुकी खरच गेम जिंकतो की घरातील इतर कोणी स्पर्धत ती ट्रॉफी स्वत:च्या नावे करतो हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तसेच विजेत्याला यावेळी काय काय मिळणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.