Bigg Boss 17 Weekend Ka Vaar: 'बिग बॉस १७'च्या घरात आयशा खानची एन्ट्री झाल्यानंतर मुनव्वर फारुकीच्या आयुष्यात वादळ आले होते. नेहमी सगळ्यांशी बोलणारा मुनव्वर आता फक्त आयशासोबतच वेळ घालवताना दिसत आहे. या आधी आयशाने मुनव्वरवर आरोप केला होता की, या प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियनने नाझिलासह नात्यात असताना देखील आपली फसवणूक केली होती. मुनव्वर त्या दोघांना एकत्र डेट करत होता. आयशाचे आरोप ऐकल्यानंतर निर्मात्यांनी तिला वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून थेट बिग बॉसच्या घरात पाठवले होते. या घरात जाण्याआधी आयशा म्हणाली होती की, ती बिग बॉसच्या घरात जाऊन मुनव्वरचं पितळ उघडं पाडणार आहे. पण, सध्या प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच घडत आहे.
आयशाने मुनव्वरवर आरोप करताच, त्याने लगेचच सर्व आरोप मान्य केले होते. इतकेच नाही तर, मुनव्वरने आयशासमोर नझिला आणि त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासाही केला होता. मुनव्वर म्हणालेला की, प्रत्यक्षात तो आणि नाझिला वेगळे झाले आहेत. पण, त्यांचे नाते तुटल्याचे त्याला नॅशनल टीव्हीवर सांगायचे नव्हते. इतकेच नाही तर, मुनव्वरने लगेचच आयेशाची माफीही मागितली होती. मुनव्वरने माफी मागितल्यानंतर आयशा तिचा सर्व राग विसरली आणि दोघेही बिग बॉसच्या घरात एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू लागले. यामुळेच बिग बॉसच्या नुकत्याच पार पडलेल्या 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान आयशाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसणार आहे.
यावेळी सलमान खान आयेशावर चांगलाच बरसणार आहे. तो आयेशाला म्हणणार आहे की, 'आयशा, या शोमध्ये येण्याचा तुझा उद्देश काय आहे? तुला फक्त नॅशनल टीव्हीवर सर्वांसमोर मुनव्वरकडून माफी हवी होती? वाद सगळ्यांमध्ये होतात. पण, अशी भांडणं नॅशनल टीव्हीवर होत नाही. स्टँड अप कॉमेडीमध्ये तुम्ही काय बोलता ते मला माहीत नाही, इथे तुमच्याशी तसे बोलले जात नाही. तुमच्यातील नाते कसे दिसतेय, त्यात जराही नाराजी नाहीये. तुम्ही केवळ खेळ चालवला आहे.' सलमान खानचे हे बोलणे ऐकून आयशा ढसाढसा रडू लागणार आहे. यावेळी मुनव्वर तिला गप्प करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, ती पुन्हा एकदा मुनव्वरवर भडकणार आहे.
संबंधित बातम्या