मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 17: मुनव्वर फारुकीचा पर्दाफाश होणार; 'बिग बॉस'च्या घरात एक्स-गर्लफ्रेंड एंट्री घेणार!

Bigg Boss 17: मुनव्वर फारुकीचा पर्दाफाश होणार; 'बिग बॉस'च्या घरात एक्स-गर्लफ्रेंड एंट्री घेणार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 15, 2023 12:25 PM IST

Bigg Boss 17 Weekend Ka Vaar: मुनव्वर फारुकीची एक्स-गर्लफ्रेंड आयशा खान सलमान खानच्या शोमध्ये येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Bigg Boss 17 Weekend Ka Vaar
Bigg Boss 17 Weekend Ka Vaar

Bigg Boss 17 Weekend Ka Vaar: छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त टीव्ही शो 'बिग बॉस'चा १७वा सीझन सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सीझनमध्ये आता आणखी एक ट्विस्ट येणार आहे. या खेळात सामील झालेला मुनव्वर फारुकी याला 'बिग बॉस सीझन १७'चा एक मजबूत स्पर्धक म्हणून पाहिले जात आहे. मुनव्वर त्याच्या खेळामुळे खूप चर्चेत असतो. आतापर्यंत त्याचा प्रवास खूप सोपा होता. पण, इथून पुढे त्याच्या वाटेत आता आणखी अडचणी येणार असल्याचं दिसत आहे. लवकरच या शोमध्ये मुनव्वरच्या एक्स-गर्लफ्रेंडची वाईल्ड कार्ड एंट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंत तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी 'बिग बॉस १७'मध्ये प्रवेश केला होता, त्यापैकी एक बाहेरही पडला आहे. आता समर्थ जुरेल आणि के-पॉप गायक ऑरानंतर या शोमध्ये आणखी एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाच्या प्रवेशाची बातमी समोर येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुनव्वर फारुकीची एक्स-गर्लफ्रेंड आयशा खान सलमान खानच्या शोमध्ये येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या शोमध्ये आयशा मुनव्वरला एक्स्पोज करणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच आयशाने मुनव्वरवर एकाच वेळी दोन मुलींना डेट केल्याचा आरोप केला होता. आता आयशा खान शोमध्ये मुनव्वर फारुकीचा पर्दाफाश करण्यासाठी येणार असल्याचे म्हटले जात आहे. 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानसोबत ती अचानक एन्ट्री घेऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार, आयशा 'वीकेंड का वार'च्या सेटवर दिसली होती. यामुळेच ती या शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करू शकते आणि मुनव्वरसोबतच्या तिच्या नात्याचे रहस्य उघड करू शकते, असे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच आयशा खानने नाव न घेता मुनव्वर फारुकी याच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याने दोन मुलींना एकाच वेळी डेट केल्याचे तिने म्हटले होते. एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र काम करत असताना आपण मुनव्वरच्या प्रेमात पडल्याचा दावा आयशाने केला होता. तिने सांगितले की, त्यावेळी मुनव्वर तिच्याशी खोटं बोलला होता की, त्याचे काही महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झाले आहे. मात्र, शोमध्ये जाण्यापूर्वी जेव्हा तिने मुनव्वरसोबत त्याच्या जुन्या मैत्रिणीचा फोटो पाहिला, तेव्हा तिला सगळे सत्य समजले. आता ती या शोमध्ये येऊन काय खुलासे करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

IPL_Entry_Point

विभाग