मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 17: ‘माझी चूक झाली’; अंकिता लोखंडेसोबत घटस्फोटाच्या चर्चेवर पहिल्यांदाच बोलला विकी जैन!

Bigg Boss 17: ‘माझी चूक झाली’; अंकिता लोखंडेसोबत घटस्फोटाच्या चर्चेवर पहिल्यांदाच बोलला विकी जैन!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 04, 2024 11:39 AM IST

Bigg Boss 17 Vicky Jain-Ankita Lokhande: 'बिग बॉस'च्या घरात त्यांच्यात अनेक भांडणे झाली होती. त्यांच्यातील वाद इतका वाढला होता की, दोघांमध्ये घटस्फोटापर्यंत चर्चा झाली होती.

Vicky Jain-Ankita Lokhande
Vicky Jain-Ankita Lokhande

Bigg Boss 17 Vicky Jain-Ankita Lokhande: 'बिग बॉस १७' संपल्यानंतर आता सगळेच स्पर्धक कधी पार्टी करताना तर, कधी एअरपोर्टवर स्पॉट केले जात आहेत. 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही जोडी नुकतीच डिनर डेटवर गेली होती. यावेळी दोघांनी एकत्र पापाराझींना पोज दिली. 'बिग बॉस'च्या घरात त्यांच्यात अनेक भांडणे झाली होती. त्यांच्यातील वाद इतका वाढला होता की, दोघांमध्ये घटस्फोटापर्यंत चर्चा झाली होती. आता शो संपला असून, विकीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. विकी म्हणाला की, घरातील वातावरणच असे झाले होते की, आम्ही दोघेही काही करू शकत नव्हतो. मात्र, आता हे सगळे 'बिग बॉस'च्या घरात घडून गेले आहे. खऱ्या आयुष्यात आम्ही वेगळे आहोत.

घटस्फोटाच्या अफवांवर विक्की जैन म्हणाला की, 'एखादे नाते तेव्हाच सुंदर बनते आणि दीर्घकाळ टिकते, जेव्हा तुम्हाला स्वतःला व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असते. एकमेकांसोबत धमाल करता येते. एकमेकांचं मित्र होता येतं. अंकिता आणि माझे नाते इतके घट्ट आहे की, काहीही झाले तरी आम्ही एकत्र राहू. आमच्या नात्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही ही परिस्थिती पाहिली. आता यातून बाहेर कसे पडायचे याकडे आमचे लक्ष असेल.’

Shahid Kapoor : शाहिद कपूर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका? निर्मात्यांसोबत चर्चा सुरू

'आयुष्य कधीच कुणासाठी थांबत नाही. घराच्या आतील संपूर्ण परिस्थिती अशी होती की, काहीच करता येत नव्हतं. हे फक्त बिग बॉसच्या घरात घडले आहे. खऱ्या आयुष्यात आम्ही खूप वेगळे आहोत. आपल्याला बाहेर कोणत्या प्रकारचे जीवन जगायचे आहे ते आपण स्वतः निवडतो. अंकिता आणि माझ्यामध्ये सर्व काही चांगले आहे आणि आमचा एकमेकांवर विश्वास आहे. विश्वास असेल, तरच तुम्ही एकमेकांशी भांडू शकता, मारू शकता, मोकळे होऊ शकता. कोणीही वेगळे होऊ नये, आणि कुणाचेही नाते तुटू नये, असे आम्हालाही वाटते. अंकिता आणि मला माहित आहे की काहीही झाले, तरी आम्ही शेवटी एकत्र राहू.’

विकी म्हणतो, 'जेव्हा आपण बाहेर असतो, तेव्हा आपल्या आवडत्या लोकांसाठी वेळ कसा काढायचा हे आपल्याला कळते. मी या शोमध्ये जे काही केले, त्यामुळे माझी एक प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळे मला कोणाचाही आधार नसल्याने मी शोला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न केला. मला असे वाटते की, मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात संतुलन राखू शकलो नाही. त्यावेळी मी अंकिताच्या वैयक्तिक गरजांसाठी वेळ देऊ शकत नव्हतो. मी त्याच्यासोबत भावनिकपणे उभे राहू शकलो नाही. ही माझी चूक झाली.’

WhatsApp channel

विभाग