मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 17: ही तर हद्दच झाली! अभिषेकच्या चेहऱ्यावर वॅक्स तर तोंडावर मिर्ची पावडर, पाहा व्हिडीओ

Bigg Boss 17: ही तर हद्दच झाली! अभिषेकच्या चेहऱ्यावर वॅक्स तर तोंडावर मिर्ची पावडर, पाहा व्हिडीओ

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 17, 2024 05:47 PM IST

Bigg Boss 17 Update: बिग बॉस १७चा विजेता लवकरच घोषीत होणार आहे. त्यापूर्वी शोमध्ये स्पर्धक भयंकार टास्क करताना दिसत आहेत.

Bigg Boss 17
Bigg Boss 17

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो 'बिग बॉस १७' सध्या चर्चेत आहे. लवकरच या शोचा विजेता घोषीत केला जाणार आहे. त्यापूर्वी घरात एक नॉमिनेशन कार्य देण्यात आले होते. या कार्यामध्ये स्पर्धकांनी केलेली कृती पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

'बिग बॉस १७'च्या या आठवड्यात मीड विक इविक्शनने सर्वांनाच धक्का बसला. समर्थ जुरेल म्हणजेच चिंटू घराबाहेर गेला. त्यानंतर आता पुन्हा शोमध्ये या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क घेण्यात आलाय या टास्कमध्ये स्पर्धकांना दोन टीममध्ये विभागण्यात आले. त्यानंतर एका गार्डन एरियामध्ये एक लोखंडाचा सापळा असलेले चौकोनी सापळा ठेवण्यात आल्या. एक एक टीमच्या सदस्यांना आतमध्ये पाच बटणे देऊन त्याला पकडून उभे करण्यात आले. विरुद्ध टीमने उभ्या असलेल्या स्पर्धकाला जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना बाहेर काढण्यासाठी स्पर्धकांनी जी शक्कल लढवली ती पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.
वाचा: 'बिग बॉस १७'च्या विजेत्याचे नशीब फळफळणार, ट्रॉफीसोबत मिळणार 'हे' बक्षीस

कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बिग बॉस १७'च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ‘ए टीम’मध्ये मुनव्वर, मन्नारा, अभिषेक आणि अरुण हे स्पर्धक आहेत. तर ‘बी टीम’मध्ये अंकिता, विक्की, आयशा आणि इशा हे स्पर्धक आहेत. यावेळी अंकिता अभिषेकच्या चेहऱ्यावर वॅक्स करताना दिसत आहे. तर आयशा मन्नाराच्या चेहऱ्यावर लाल मिरची पावडर फेकताना दिसत आहे. ‘बी टीम’कडून जबरदस्त टॉर्चर केले जात असले तरी मुनव्वर, मन्नारा, अभिषेक आणि अरुण दिलेल्या जागेवर तग धरून उभे आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काय मिळणार 'बिग बॉस १७'च्या विजेत्याला गिफ्ट?

'बिग बॉस १७'च्या विजेत्याला एक ट्रॉफी, आलिशान कार आणि ५० लाख रुपयांचे रोख बक्षिस मिळणार आहे. या बक्षिसाने एखाद्या स्पर्धकाचे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. त्यामुळे कोणता स्पर्धक ट्रॉफीवर त्याचे नाव कोरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp channel
विभाग