छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉस १७ हा सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सहभागी झाल्यापासूनच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शोमध्ये त्यांची सतत भांडणे होत असतात पण त्यांच्यामधील प्रेम देखील प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अंकिताची बिग बॉसच्या घरात प्रेग्नंसी टेस्ट करण्यात आली. आता टेस्टचा रिपोर्ट समोर आला आहे.
झूमने दिलेल्या वृत्तानुसार, अंकिताच्या प्रेग्नंसीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. ती आई होणार नाही. हे ऐकल्यावर चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी अंकिता आता शेवटपर्यंत शोमध्ये दिसणार असल्याचा आनंद व्यक्त केला आहे. तर काही यूजरने त्यांनी आई-बाबा व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. सध्या सर्वत्र अंकिताच्या या टेस्टची चर्चा रंगली आहे.
वाचा: करण जोहरच्या पार्टीत सिद्धार्थ-कियाराचे मिटले होते भांडण, कॉफी विथ करणमध्ये खुलासा
अंकिता जिग्ना आणि रिंकूशी बोलताना शोमध्ये दिसली होती की तिला आबंट खायची इच्छा होत आहे. तर दुसरीकडे ती विकीला सांगते की तिचे पीरेड्स आलेले नाहीत आणि प्रेग्नंसी टेस्ट करणे आवश्यक वाटत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी नावेद घरातून बाहेर आला तेव्हा मीडियाशी संवाद साधताना याविषयी बोलला. 'सगळं काही सुरळीत सुरु आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे. अंकिताने मला वचन दिले आहे की तिच्या मुलाचे नाव ठेवण्यासाठी मला मदत करु देईल. आम्ही हिंदी आणि वेस्टर्न असे मिळून नाव ठेवणार आहोत. माझ्या डोक्यात काही नावे आहेत पण योग्य वेळ येताच मी शेअर करेन' असे नावेद म्हणाला.
'बिग बॉस १७' हा कार्यक्रम सुरू होऊन आता सहा आठवडे झाले आहेत. या पर्वात चर्चेत असणाऱ्या व्यक्तींमध्ये अंकिताचा समावेश होतो. 'बिग बॉस १७'च्या अनेक भागांमध्ये अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनसोबत दिसून आली आहे. विकीला 'मास्टर माइंड' हा टॅग मिळाला आहे. पण अंकिताचा खेळ मात्र चाहत्यांच्या पसंतीस उतरलेला नाही. पण गेल्या काही दिवसांपासून अंकिता आणि विकी वेगवेगळे खेळताना दिसत आहेत.
संबंधित बातम्या