Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’च्या प्रत्येक एपिसोडसाठी सलमान आकारणार तगडी फी; आकडा बघून व्हाल हैराण!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’च्या प्रत्येक एपिसोडसाठी सलमान आकारणार तगडी फी; आकडा बघून व्हाल हैराण!

Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’च्या प्रत्येक एपिसोडसाठी सलमान आकारणार तगडी फी; आकडा बघून व्हाल हैराण!

Oct 12, 2023 09:55 AM IST

Bigg Boss 17 Salman Khan Fess: नव्या सीझनप्रमाणेच सलमान खानच्या मानधन रकमेत देखील आता चांगलीच वाढ झाली आहे.

Bigg Boss 17
Bigg Boss 17

Bigg Boss 17 Salman Khan Fess: छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चा १७वा सीझन आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसचा हा १७वा सीझन अतिशय धमाकेदार असणार आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांना अनेक वादग्रस्त सेलिब्रिटी पाहायला मिळणार आहेत. दुसरीकडे, पुन्हा एकदा सलमान खान या शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. नव्या सीझनप्रमाणेच सलमान खानच्या मानधन रकमेत देखील आता चांगलीच वाढ झाली आहे. यावेळी सलमान खान याने देखील आपल्या फीमध्ये घसघशीत वाढ केली आहे. या शोमध्ये कोणकोणते कलाकार सामील होणार हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, सलमान खान आता हा सीझन गाजवणार हे नक्की झालं आहे,

‘बिग बॉस १७’च्या सूत्रसंचालनासाठी सलमान खान याला तगडी रक्कम दिली जाणार आहे. ‘बिग बॉस १७’च्या एका फॅन पेजवर याची माहिती शेअर करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान याला प्रत्येक आठवड्यासाठी तब्बल १२ कोटी रुपये इतके मानधन दिले जाणार आहेत. संपूर्ण आठवड्यात सलमान खान केवळ २ एपिसोड्सच शूट करतो. म्हणजे प्रत्येक एपिसोडसाठी त्याला तब्बल ६ कोटी रुपये दिले जाणार आहेत. सध्या यावर वाहिनी किंवा शोच्या निर्मात्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

यावेळी बिग बॉस १७ची थीम अतिशय रंजक असणार आहे. यावेळी ‘बिग बॉस १७’मध्ये प्रेक्षकांना बिग बॉसच्या डोळ्यांसोबतच, त्यांचं डोकं, हृदय आणि दम देखील दिसणार आहे. म्हणजेच यावेळी घर तीन विभागात विभागलेले दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस’च्या हृदयाच्या भागात या सीझनमध्ये सामील होणारे कपल्स राहणार आहेत. तर, सगळे सिंगल स्पर्धक डोक्याच्या विभागात आणि काही विशेष अधिकार असलेले लोक ‘दम’ या विभागात दिसणार आहेत. या सीझनमध्ये धमाल पाहायला मिळणार आहे. अनेक वादग्रस्त सेलिब्रिटी या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस १७’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Whats_app_banner