छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो 'बिग बॉस १७' सध्या चर्चेत आहे. लवकरच या शोचा विजेता घोषीत केला जाणार आहे. त्यापूर्वी बिग बॉसच्या घरात वेगवेगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत. आता बिग बॉस १७च्या घरातील एका स्पर्धकाचे नशीब चमकले असल्याचे समोर आले आहे. नेमकं काय झाले वाचा...
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान बिग बॉस १७चा ग्रँड फिनाले होस्ट करणार आहे. या फिनालेमध्ये विजेता घोषित केला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी एका स्पर्धकाला मोठे सरप्राइज मिळाले आहे. चक्क दिग्दर्शक रोहितच शेट्टीच्या खतरों के खिलाडी या शोच्या नव्या सिझने सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. आता हा स्पर्धक कोणता? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: विषारी किड्याने स्पर्श करताच अभिनेत्याला आला हार्ट अटॅक
नुकताच रोहित शेट्टी बिग बॉस १७च्या घरात सहभागी झाला. त्याने स्पर्धकांकडून काही स्टंट करुन घेतले. समोर आलेल्या माहितीनुसार, रोहितने घरातील पाच स्पर्धकांना स्टंट दिला होता. या टास्क जिंकणाऱ्याला रोहितने खतरों के खिलाड़ी सीझन १४ मध्ये सहभागी होण्याची संधी दिली आहे. आजच्या भागात हा स्पर्धक कोण हे स्पष्ट होणार आहे.
यापूर्वी बिग बॉस १६चा उपविजेता शिव ठाकरेला रोहित शेट्टीने ऑफर दिली होती. त्यासोबतच त्याने अर्चना गौतमला देखील खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होण्यास सांगितले होते. त्यापूर्वी बिग बॉस १३मध्ये देखील रोहित शेट्टीने काही स्टंट केले होते.
अंकिता लोखंडे गेममधून बाहेर पडली आहे. त्यामुळे आता बिग बॉस १७च्या ट्रॉफिवर मुनव्वर फारूकी, मनारा चोप्रा आणि अभिषेक कुमार या तीन स्पर्धकांपैकी कोण नाव कोरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'बिग बॉस १७'च्या विजेत्याला एक ट्रॉफी, आलिशान कार आणि ५० लाख रुपयांचे रोख बक्षिस मिळणार आहे. या बक्षिसाने एखाद्या स्पर्धकाचे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. त्यामुळे कोणता स्पर्धक ट्रॉफीवर त्याचे नाव कोरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.