Vicky Jain and Ankita Lokhande: छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. बिग बॉसचे १७वे पर्व नुकताच सुरु झाले आहे. यावेळी देखील बॉलिवूडचा भाईजान सलमान खान शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. यंदाच्या सिझनमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन शोमध्ये सहभागी झाले आहेत. पण, अंकिताच्या वागण्यामुळे विकी चिडला असल्याचे दिसत आहे.
नुकताच बिग बॉस १७चा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये विकी अंकितावर चिडलेला दिसत आहे. प्रोमोमध्ये अंकिता बोलताना दिसत आहे की 'तिला एकटे वाटत आहे.' त्यावर विकीने 'मी सारखं तुझ्या मागेमागे नाही फिरु शकत' असे उत्तर दिले आहे. अंकिताचे वागणे पाहून नेटकरीदेखील संतापले आहेत.
वाचा: बिग बॉसच्या घरात 'वीकेंड का वार' होणार; 'हा' प्रसिद्ध चेहरा घरातून बाहेर जाणार!
बिग बॉस शोमध्ये अंकिताचे वागणे हे खूप पजेसिव वाटत आहे. तर तिचा पती विकी उत्तम खेळ खेळताना दिसत आहे. अंकिता सतत 'तू माझ्याकडे लक्ष देत नाही. मला या घरात एकटे वाटत आहे. मला कायम असे वाटयचे की तू माझी ताकद आहेस पण असे अजिबात नाही' अशी तक्रार विकीकडे करताना दिसत आहे. ते ऐकून विकी चिडतो आणि म्हणतो, 'मी दिवसभर तुझ्या मागे फिरत बसू का? नाही करु शकत असे. मला स्वत:चे नाक कापून घ्यायचे नाही. तो तुझ्या आयुष्यातला रफ पॅच होता.' लगेच अंकिता विकीला टोकते आणि म्हणतो, 'प्रत्येक वेळी हा टॉपिक का काढतो.' (कदाचित विकी हा सुशांत आणि अंकिताच्या ब्रेकअप विषयी बोलताना दिसत होता.)
संबंधित बातम्या