मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात सेक्स करतात?; स्पर्धकाने सांगितले सत्य

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात सेक्स करतात?; स्पर्धकाने सांगितले सत्य

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 21, 2023 02:08 PM IST

Navid Sole: समर्थ जुरेल आणि ईशा मालविश यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता यावर नाविद सोलने प्रतिक्रिया दिली आहे.

Bigg Boss 17
Bigg Boss 17

काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस १७'च्या घरातून स्पर्धक नाविद सोलला बाहेर पडावे लागले. त्यावेळी तिने अभिषेक विषयी मनात खूप चांगले स्थान असल्याचे सांगितले आहे. घरातून बाहेर पडल्यावर नाविदने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला प्रश्न विचारण्यात आला होता की 'घरात सेक्स देखील करतात का?' त्यावर नाविदने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बिग बॉसच्या घरात समर्थ आणि ईशा यांचे वागणे सर्वांनाच खटकत आहे. त्यावर आता नाविदने वक्तव्य केले आहे. नाविद आणि अभिषेकमध्ये खूप चांगले नाते होते. घरातून बाहेर पडताच नाविदला सिद्धार्थ कननने समर्थ आणि ईशाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ दाखवून घरात सेक्स केला जातो का? असा प्रश्न विचारला. या व्हिडीओमध्ये समर्थ आणि ईशा मिठी मारुन ब्लँकेटमध्ये बसले आहेत. शेजारीच नाविद पण बसला होता.
वाचा: शेन्निस पलासियोसने जिंकला 'मिस यूनिवर्स'चा किताब, या प्रश्नाने जिंकला ताज

'तेव्हा असे काही झाले नव्हते. तिथे जिग्नाचा पाय होता. ती पायची स्ट्रेचिंग करत होती. ती पाय वर खाली करत होती' असे नाविद म्हणाला. त्यानंतर समर्थ आणि ईशा यांच्याविषयी नाविद बोलताना म्हणाला की, 'मी इमानदारीने सांगतो जेव्ही मी हार्ट रुममध्ये होते तेव्हा नोटिस केले की ईशा आणि समर्थ सतत ब्लॅकेटमध्ये काही तर करत असायचे. मी अंकिताला पण हे सांगितले होते. त्यावर ती म्हणाली की मला नाही माहिती त्यांचे काय सुरु आहे. कदाचित योग सुरु असेल.'

नाविदने पुढे सांगितले की समर्थचे घरातील वागणे कोणालाच पटत नाही. तो सतत ईशाच्या पाठी असतो. तो खूप चांगला मुलगा आहे पण हरवला आहे. तसेच नील, मुनव्वर आणि विकी हे खूप हुशार आहेत. विकी घरात नसेल तर अंकिता खूप चांगले खेळेल असे देखील तो पुढे म्हणाला.

WhatsApp channel

विभाग