Bigg Boss 17 Latest Update: सलमान खानचा लोकप्रिय टीव्ही शो 'बिग बॉस १७' आता प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. यावेळी अनेक सेलिब्रिटींची घरात एन्ट्री झाली आहे. कंगना रनौतच्या 'लॉकअप सीझन १'चा विजेता मुनव्वर फारुकी देखील या बिग बॉस १७मध्ये सहभागी झाला आहे. मुनव्वर फारुकी हा अतिशय चर्चेतला चेहरा आहे. त्याच्या तुरुंगात जाण्यापासून ते त्याच्या लग्नापर्यंत आणि मुलापर्यंत सगळ्याच गोष्टी नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. नेहमी सगळ्यांना हसवणारा मुनव्वर फारुकी आता बिग बॉस १७च्या घरात ढसाढसा रडताना दिसला आहे.
मुनव्वर फारुकी या शोमध्ये आपले खरे व्यक्तिमत्त्व दाखवून चाहत्यांची मने जिंकत आहेत. दरम्यान, आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या घरात येताच मुनव्वर फारुकी रडू लागल्याचे त्यात दिसत आहे. त्याला असे भावूक होताना पाहून आता चाहतेही टेन्शनमध्ये आले आहेत. कलर्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शोची एक नवीन व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. यामध्ये मुनव्वर फारुकी भावूक होऊन रडताना दिसला आहे.या व्हिडीओत तो त्याची कहाणी सांगत आहे. यादरम्यान त्याला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि कॅमेरासमोर तो रडू लागला. मुनव्वरची अशी काय अवस्था झाली ते जाणून घेऊया…
या व्हिडीओत मुनव्वर फारुकी नील भट्टसोबत बोलताना दिसत आहेत. यादरम्यान मुनव्वरला त्याचा भूतकाळ आठवतो आणि तो नीलशी त्याच्या मुलाबद्दल बोलताना दिसतो. तो म्हणतो की, गेल्या काही महिन्यांत त्याचे त्याच्या मुलासोबतचे नाते खूप घट्ट झाले आहे. तो सतत त्याच्या मनात असतो. हे सगळं सांगताना त्याला भावुक झालेलं पाहून चाहते दु:खी झाले आहेत. मात्र, यावेळी नील आणि अभिषेक मुनव्वरची साथ देताना आणि त्याची काळजी घेताना दिसले आहेत.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रेक्षक या एपिसोडची वाट पाहत आहेत. मुनव्वर फारुकीच्या वैयक्तिक आयुष्यातील या गोष्टी ऐकण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. कॉमेडियनच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडले, हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. लॉकअप या शोमध्येही त्याने अनेक धक्कादायक गुपिते उघड करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
संबंधित बातम्या