Bigg Boss 17 Latest Update: ‘बिग बॉस १७’च्या घरात आता स्पर्धक एकमेकांशी चांगलेच हाणामारी करताना दिसत आहे. दरवर्षीच या शोमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळतो. यावेळी देखील 'बिग बॉस १७'च्या घरात मोठा हंगाम पाहायला मिळत आहे. या शोमध्ये आता दोन अभिनेत्रींमध्ये चांगलीच जुंपताना दिसणार आहे. मन्नारा चोप्रा आणि अंकिता लोखंडे यांच्यातील वाद आता टोकाला गेल्याचे पाहायला मिळणार आहे. दोघीही एकमेकींशी जबरदस्त भांडण करताना दिसणार आहेत. दोघींनी एकमेकींवर कॉफी फेकून आता चांगलाच हंगाम केला आहे.
'बिग बॉस १७'च्या घरात सध्या स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. या शोमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची जोडी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या दोघांचीही विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते. मात्र, आता मन्नारा आणि अंकितामधील दुश्मनी टीव्हीच्या पडद्यावर दिसणार आहे. आता या दोघींमधील मारामारीही पाहायला मिळणार आहे. अंकिता लोखंडे व मन्नारा चोप्रा यांच्यातील वाद काही केल्या थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. या शोच्या आगामी भागात पुन्हा एकदा प्रेक्षकांना मन्नारा व अंकिता यांच्यातील तुंबळ युद्ध पाहायला मिळणार आहे.
नुकताच 'बिग बॉस १७' या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये मन्नारा व अंकिता एकमेकांशी जोरदार भांडण करताना दिसल्या आहेत. या व्हिडीओवर आता नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. या प्रकारामुळे नेटकरी मन्नारावर नाराज झाले आहेत. अंकिता आणि मन्नारा यांच्यातील वाद आता जगजाहीर आहेत. या वादांना अंकिता देखील वैतागली आहे. ती या घरातून बाहेर पाडण्यासाठी काहीही करायला तयार असल्याचे, पती विकीला सांगताना दिसली होती.
'बिग बॉस १७'च्या आगामी भागात स्पर्धकांना एक टास्क देण्यात येणार आहे. या टास्कमध्ये अंकिता मन्नारा चोप्राला नॉमिनेट करणार आहे. या नॉमिनेशनचे कारण देताना अंकिता म्हणते की, 'आपण दोघी एकमेकींना आवडत नाही. त्यामुळे मला हे शत्रुत्व कायम ठेवायचे आहे. त्यासाठी मी तुला नॉमिनेट करत आहे.' यानंतर ती मन्नाराच्या अंगावर कॉफी फेकणार आहे. त्यानंतर मन्नाराही अंकिताला नॉमिनेट करून तिच्या तोंडावर कॉफी फेकणार आहे.
संबंधित बातम्या