मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 17: करण जोहरने प्रियांका चोप्राच्या बहिणीला चांगलंच सुनावलं! म्हणाला...

Bigg Boss 17: करण जोहरने प्रियांका चोप्राच्या बहिणीला चांगलंच सुनावलं! म्हणाला...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 02, 2023 08:28 AM IST

Bigg Boss 17 Latest Update: 'बिग बॉस १७'चा 'वीकेंड का वार' होस्ट करण्यासाठी आलेला करण जोहर आता मन्नाराच्या मैत्रीवरच प्रश्न उपस्थित करणार आहे.

Karan Johar angry on Mannara Chopra
Karan Johar angry on Mannara Chopra

Bigg Boss 17 Latest Update: बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर या आठवड्यात छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीझन १७'चा 'वीकेंड का वार' होस्ट करताना दिसणार आहे.कॅयावेळी तो प्रियांका चोप्राची बहीण मन्नारा हिला बोल लग्नावताना दिसणार आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात मन्नाराचा आवाज जास्तच ऐकू आला आहे. प्रियंका चोप्राची धाकटी बहीण मन्नारा चोप्रा अंकिता लोखंडेवर ओरडताना दिसली. इतकंच नाही तर, ती तिचे मित्र यूके रायडर ०७ आणि मुनव्वर फारुकी यांच्याकडून त्यांच्या मैत्रीचा पुरावा मागताना दिसली. यावरच करण जोहर संतापला आहे. यावेळी तो तो मन्नाराचा चांगलाच क्लास घेणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'बिग बॉस १७'चा 'वीकेंड का वार' होस्ट करण्यासाठी आलेला करण जोहर आता मन्नाराच्या मैत्रीवरच प्रश्न उपस्थित करणार आहे. करण जोहर विचारणार आहे की, 'जर तू मुनव्वर आणि अनुराग डोभाल यांना स्वतःचे मित्र मनात असशील तर, तू मुन्नवर फारुकीला नॉमिनेट केलंस तेव्हा, तुमच्या दुसऱ्या मित्राला अनुरागला का विचारले नाहीस?. अनुरागने मन्नारासमोर मुनव्वर फारुकीला अनेकदा टार्गेट केले आहे. मात्र, स्वतःला नॉमिनेट करून संपूर्ण घराची धुरा आपल्यावर असल्याचे दाखवणाऱ्या मन्नारा चोप्राने या प्रकरणावर नेहमीच मौन बाळगले आहे.

नुकतेच अंकिता लोखंडेने मुनव्वरशी बोलताना म्हटले होते की, ती आता त्याच्यासोबत फार कमी वेळ घालवेल, कारण तिला वाटते की त्यांच्या मैत्रीमुळे मन्नारा आणि मुनव्वर यांच्यातील भांडणे वाढत आहेत. मन्नारामुळे अंकिता आणि मुनव्वर यांच्यातच नाही, तर अभिषेक कुमार आणि मुनव्वर यांच्या मैत्रीतही दुरावा निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल मुनव्वरने 'बिग बॉस १७'मध्ये असलेली त्याची सहकारी स्पर्धक रिंकू धवनशी चर्चा केली. तो म्हणाला की, मन्नारासोबतच्या मैत्रीमुळे घरातील बाकीचे नातेसंबंध त्याच्यापासून दूर होत आहेत. आता करणच्या प्रश्नांनंतर मन्नारा आणि मुनव्वर यांच्यातील नाते तुटणार की भविष्यात त्यांची मैत्री कायम राहणार? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

IPL_Entry_Point