Bigg Boss 17 Latest Update: 'बिग बॉस'च्या नव्या सीझनमध्ये एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले आहेत. यामध्ये काही चेहरे हे टीव्ही विश्वातील अतिशय प्रसिद्ध चेहरे आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सध्या या घरातील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. सुशांत सिंहा राजपूतसोबतच्या 'पवित्र रिश्ता' या सुपरहिट शोमुळे ही अभिनेत्री चर्चेत आली होती. मात्र, आता 'बिग बॉस १७'च्या मंचावर प्रथमच अंकिता लोखंडेचे खरे व्यक्तिमत्त्व चाहत्यांना पाहायला मिळत आहे. यावेळी अभिनेत्रीला पसंती मिळण्याऐवजी ती प्रेक्षकांच्या मनात व्हिलन ठरत चालली आहे.
'बिग बॉस १७'च्या निर्मात्यांनी शोचा एक प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मन्नारा चोप्रा हिचा तिच्या बॉयफ्रेंडवरून अंकिता लोखंडेसोबत जोरदार वाद झाला. खरं तर यावेळी चर्चा ईशा मालवीयाची सुरू होती. मन्नाराने ईशाच्या बॉयफ्रेंडचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. मात्र, मन्नाराचे बोलणे अंकिताला अजिबात आवडले नाही आणि तिला याचा राग आला. यावर अंकिता अभिनेत्री ओरडली आणि म्हणाली, 'कोणाच्याही चारित्र्यावर बोट ठेवू नकोस, नाही तर मलाही तुझे कॅरेक्टर सांगावे लागेल.' यावेळी अंकिताला रागावलेले पाहून मन्नारा रडू लागते. तिला देखील अंकिताच्या वागण्यामुळे प्रश्न पडला आहे.
मन्नारा आणि अंकिताच्या या व्हिडीओवर 'बिग बॉस'च्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी अंकिताला तिच्या या वागण्यामुळे 'टॉक्सिक' म्हटले आहे. काही चाहत्यांनी तर अंकिताला चांगलेच फटकारले आहे. 'बिग बॉस १७'मध्ये सध्या १७ स्पर्धकांची चुरस पाहायला मिळत आहे. सध्या घरात असलेल्या या स्पर्धकांच्या यादीमध्ये टीव्ही, चित्रपट आणि सोशल मीडिया स्टार्सचा समावेश आहे. अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, नाविद, मुनव्वर फारुकी, विक्की जैन, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, ईशा मालवीय, सना रईस खान, सोनिया बन्सल, अनुराग डोवाल, जिग्ना व्होरा, फिरोझा खान, सनी आर्य, रिंकू धवन आणि अरुण श्रीकांत मशेट्टी हे सेलिब्रिटी सध्या घरात आहेत.
संबंधित बातम्या