Bigg Boss 17 Latest Update: सध्या 'बिग बॉस १७'मध्ये आता मुनव्वर फारुकी चांगलाच अडचणीत सापडला आहे. आयशा खानने वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून या शोमध्ये प्रवेश केला, तेव्हापासून या शोमध्ये नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मुनव्वरबाबत आयशा खान एकामागून एक धक्कादायक खुलासे करत आहे. अलीकडेच तिने म्हटले होते की, मुनव्वर तिला आणि नाझिलाला एकाच वेळी डेट करत होता. आता आयशाने मुनव्वरच्या मुलाबद्दल एक जबरदस्त खुलासा केला आहे. मुनव्वरबद्दल बोलताना आयेशा म्हणाली की, मुनव्वरने सांगितले होते की, तो गेल्या ६ महिन्यांपासून आपल्या मुलासोबत राहत होता, पण हे खोटे आहे. आयशाने म्हणाली की, ते दोघे गेल्या दोन महिन्यांपासून एकत्र होते आणि मुनव्वरने आपल्या मुलाबद्दल देखील खोटे सांगितले होते. तो केवळ एक आठवडाच आपल्या मुलासोबत राहिला होता.
याआधी आयेशाने मुनव्वरच्या स्वभावाबद्दल बोलतानाही सांगितले होते की, मुनव्वरने तिच्यासमोर नाझिलाची नकारात्मक प्रतिमा तयार केली होती. तो नाझिलाबद्दल म्हणाला होता की, ती खूप वाईट मनाची आणि रागीट आहे. पण दुसरीकडे, आयशा म्हणाली की, जेव्हा मी स्वतः नझिलाशी बोलले, तेव्हा मला कळले की, नाझिला मनाने खूप चांगली आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या नव्या प्रोमोमध्ये मुनव्वर आणि मन्नारा चोप्रा यांच्यातील नातेही तुटल्याचे दिसून आले आहे.
'बिग बॉस'च्या घरात वाद होतच राहतात. मात्र, जेव्हा मनोरंजनाचा विषय येतो, तेव्हा बिग बॉसचे मेकर्स प्रेक्षकांना मेजवानी देतात. या शनिवार आणि रविवार बिग बॉसच्या घरात मोठे वाद पाहायला मिळणार आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने यावेळी अब्दू आणि रवीना टंडन 'वीकेंड का वार'मध्ये पाहुणे म्हणून दिसणार आहेत. अब्दू कुटुंबातील सदस्यांसाठी सांता बनणार आहे.
संबंधित बातम्या