Bigg Boss 17 Latest Update: टीव्हीवरचा सर्वात लोकप्रिय शो 'बिग बॉस १७'मध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन दररोज भांडताना दिसत आहेत. या शोमध्ये दोघांच्या नात्यामध्ये अनेक गोष्टी बिघडताना दिसत आहेत. अंकिता आणि विकी यांच्यात सतत वाद होत आहेत. पण, यावेळी अंकिता आपल्या पतीवर इतकी नाराज झाली आहे की, तिने एक मोठा निर्णय घेतला आहे. पती विकी याच्यावर नाराज झालेल्या अंकिता लोखंडेने आता एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अंकिताने शोमध्ये आपल्याला आता विकीपासून दूर राहायचे आहे, असे म्हटले आहे. अभिनेत्रीच्या याच वक्तव्याने आता चांगलीच खळबळ उडाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अंकिता लोखंडे हिचं हे वक्तव्य येत्या भागांत पाहायला मिळणार आहे. आगामी भागात अंकिता म्हणताना दिसणार आहे की, आता तिला विकीसोबत राहायचे नाही. आगामी एपिसोडमध्ये विकी किचनमध्ये काम करताना दाखवण्यात येणार आहे. दरम्यान, तो अंकिताला त्याच्यासोबत स्वयंपाकघरात येऊन काम करण्यास सांगेल. यानंतर चिडलेल्या अंकिताने त्याला रागाची परीक्षा न घेण्याचा इशारा देईल. पण, विकीने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला आणखी चिथावणी देतो.
यावर अंकिता त्याला बोलणार आहे की, माझ्याशी असं वागू नकोस, मी या सगळ्याला कंटाळले आहे. मला अजून तुझ्या आयुष्यात राहायचं नाही, तुझ्यापासून दूर जाऊ असं वाटू लागलं आहे, असं अंकिता त्याला म्हणणार आहे. काही दिवसांपूर्वीच विकीने अंकितावर हात उचलण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये विकीने अभिषेक आणि अरुणसमोर अंकितावर हात उचलण्याचा प्रयत्न करताना दिसला होता. यावर त्याच्यावर बरीच टीका देखील करण्यात आली होती.